नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत एका वडिलांनी आपल्या चिमुकल्या मुलाची आणि पत्नीची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. एका मुलाची हत्या केली आता ४ वर्षांचा दुसरा मुलगा वडिलांविरोधात साक्ष देणार आहे.

दिल्लीच्या शकूरपूर भागात शुक्रवारी एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलाची हत्या केली आहे. हत्येनंतर तो चार तास तसाच मृतदेहाजवळ बसून होता. आरोपी पती त्याच्या पत्नीवर चारित्र्यावरुन संशय घेत होता. आता आरोपीचा दुसरा चार वर्षांचा मुलगा वडिलांविरोधात साक्ष देणार आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ब्रिजेश आपल्या कुटुंबासोबत शकूरपूरमध्ये मजूरीचं काम करायचा. त्याने २४ वर्षीय पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलाची धारदार शस्त्राने हत्या केली. पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहांशेजारी बसून होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ब्रिजेशने २०१६ मध्ये महिलेशी लग्न केलं होतं. त्यांना एक चार वर्षांचा आणि दुसरा दीड वर्षांचा मुलगा होता. आरोपी ब्रिजेशचा पत्नीवर तिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच रागातून त्याने पत्नीची हत्या केली.

पतीला संपवलं, मग रात्रभर मृतदेहासोबत झोपली, सकाळ होताच…
ब्रिजेश बल्ब होल्डरमध्ये पिन लावण्याचं आणि पॅकिंगचं काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजेशचा त्याचा पत्नीवर संशय होता. तसंच दीड वर्षांचा मुलगा त्याचा नसल्याचा त्याला संशय होता. त्यांच्या दीड वर्षाच्या लहान मुलाचा चेहरा त्याच्या चेहऱ्याशी जुळत नाही याच संशयावरुन त्याने माय-लेकाची हत्या केली.

दोन दिवसांपूर्वी ब्रिजेशचं त्याच्या पत्नीसोबत रात्री दोनच्या सुमारास भांडण झालं होतं. त्यानंतर त्याने पत्नीला मारहाण केली. त्यांचं हे भांडण वाढत गेलं आणि ब्रिजेशने पत्नीचा स्वयंपाकघरातील चाकूने पत्नीचा गळा कापून हत्या केली. त्याचं वेळी त्यांचा दीड वर्षांचा मुलगा झोपेतून उठला आणि रडू लागला. आरोपीने चिमुकल्याचाही गळा कापून हत्या केली.

कपाळावर कुंकू लावलं, हातात चुडा घातला अन् मृत्यूला कवटाळलं; फ्लॅटमध्ये प्रेमी युगुलाचा अंत
त्यानंतर त्याने पोलिसांना कॉल करुन स्वत: डबल मर्डरबाबत सांगितलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी पत्नी आणि मुलगा खाली मृतावस्थेत पडलेले होते. पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here