नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) निवडक मुदत ठेवीवरील व्याजदरात ०.३० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. व्याजदर ०.०५ ते ०.३० टक्क्यांच्या श्रेणीत वाढले असून २७१ दिवस आणि एका वर्षापेक्षा कमी मुदतीच्या ठेवींसाठी बँकेने नियमित ग्राहकांसाठी व्याजदर ५.५० टक्क्यांवरून ५.८०% पर्यंत वाढवले आहेत.

२ ते ३ वर्षांच्या मुदत ठेवीवरील व्याजदर
एका वर्षापासून ६६५ दिवसांत परिपक्व होणार्‍या मुदत ठेवीवरील व्याजदर ०.०५ टक्क्यांनी वाढवून ६.८० टक्के करण्यात आले. त्याचप्रमाणे ६६७ दिवस आणि दोन वर्षांच्या मुदतीच्या मुदत ठेवीवर व्याजदर ०.०५% वाढवून ६.८० टक्के इतका असणार आहे. तसेच दोन वर्षे ते टेन वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवींच्या दरात ०.२५ टक्क्यांनी वाढ झाली असून तो ६.७५% वरून ७% पर्यंत वाढला आहे.

DA Hike Update: महागाई भत्त्याची प्रतिक्षा संपली, या दिवशी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी
ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवीवरील व्याजदर
पीएनबीने २७१ दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर ६% वरून ०.३० टक्क्यांनी ६.३० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. बँकेने एक वर्ष आणि ६६५ दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर ०.०५ टक्क्यांनी वाढवून ७.३० टक्के केला आहे. तर ६६७ दिवस आणि दोन वर्षात परिपक्व होणार्‍या मुदत ठेवीवर व्याजदर ०.०५ टक्क्यांनी वाढवून ७.३०% केला. तसेच दोन वर्षे ते तीन वर्षे मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर ७.२५% वरून ७.५०% पर्यंत वाढवला आहे.

Money Saving Tips: खरेदी करताना या बाबी लक्षात ठेवा आणि असे पैसे वाचवा!
अति ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीवरील व्याजदर
अति ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेने २७१ दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधी असलेल्या मुदत ठेवीवरील व्याजदर ६.३०% वरून ६.६०% पर्यंत म्हणजे ०.३० टक्क्यांनी वाढवले. बँकेने एक वर्षासाठी ६६५ दिवस आणि ६६७ दिवस ते दोन वर्षांसाठी ठेव दर ०.०५ टक्क्यांनी वाढवून ७.६० टक्के केले असून बँकेने दोन वर्षांपेक्षा जास्त आणि ३ वर्षांपर्यंतच्या एफडीवर ७.५५% वरून ७.८०% पर्यंत व्याजदर वाढवला आहे. लक्षात घ्या की अति जेष्ठ नागरिकांसाठी वयोगट हा ६० ते ८० वर्षे इतका असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here