अहमदनगर : राळेगणसिद्धी येथील लेफ्टनंट सौरभ भागुजी औटी यांचे जम्मू- काश्मीरमधील लडाख भागात कर्तव्यावर असताना अपघाती निधन झाले. त्यांच्यावर राळेगणसिद्धी येथे सोमवारी सकाळी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कर्तव्यावर असताना मागील आठवड्यात लेफ्टनंट औटी यांच्या वाहनाला अपघात झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी त्यांचे निधन झाले. लष्करात थेट अधिकारी पदावर निवड होणारे सौरभ औटी हे पहिले होते. एनडीएमधील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दोन वर्षांपूर्वीच ते अधिकारी म्हणून लष्करात दाखल झाले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला होता. गावातील तरुणांना लष्कर भरतीसंबंधी मार्गदर्शन करणार असल्याचे त्यावेळी औटी यांना सांगितले होते. दुर्दैवाने दोनच वर्षांत त्यांना अखेरचा निरोप देण्याची वेळ गावकऱ्यांवर आली.

लेफ्ट. सौरभ यांचा मृतदेह लष्करी विमानाने पुण्यात व तेथून लष्करी वाहनाने राळेगणसिद्धी येथे आणाण्यात आला. राळेगणसिद्धीमध्ये साश्रूनयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, खासदार डॉ. सुजय विखे, लष्करातील व पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

औटी यांचे वडील मुंबईत पोलीस निरीक्षक आहेत. सौरभ दोन वर्षांपूर्वीच लष्करात अधिकारीपदावर थेट भरती झाले होते. जम्मू येथील १६८व्या तोफखाना रेजिमेंटमध्ये दाखल झाले होते. राळेगणसिद्धी परिवारातील सर्व आजी माजी सैनिकांनी एकत्र येत हजारे यांच्या हस्ते सौरभ यांचा सत्कार केला होता. यावेळी बोलताना सौरभ म्हणाले होते, ‘एनडीएसारख्या संस्थेतून प्रशिक्षण घेतल्यानंतर जीवनातील कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाऊ शकतो. अण्णासाहेब हजारे व माझ्या घरातील सदस्य त्यांचे समाज व देशासाठी असलेले काम पाहूनच मलाही देशासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. यापुढे तरुणांना लष्करात येण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे.’

रक्ताला कुठे जात असते? रक्तदान शिबिराचं आयोजन करुन मुस्लिम मावळ्यांकडून शिवजयंती साजरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here