मुंबई: संदर्भात गेले काही दिवस एक फेस व्हायरल झाला असून या फसव्या व्हॉट्सअॅप मेसेजला बळी पडू नका व सायबर भामट्यांपासून सावध राहा, असे आवाहन विभागामाने केले आहे. याबाबत कोणती काळजी घ्यायला हवी, याचा तपशीलही सायबर पोलिसांनी दिला आहे. ( alert On )

वाचा:

देशात आणि राज्यात सध्या साथीने थैमान घातले आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह सर्व शासकीय यंत्रणाही अहोरात्र झटून काम करत आहेत. अशावेळी सायबर भामटेही मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले असून सायबर पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सायबर भामट्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून त्याचवेळी नागरिकांनाही खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

वाचा:

गेल्या काही दिवसांपासून ऑक्सी पल्स मीटरबाबत एका फसव्या मेसेजने धुमाकूळ घातला आहे. एक विशिष्ट डाऊनलोड केले तर तर, तुम्ही घरच्या घरी आपले बॉडी पल्स (body pulse) व रक्तातील ऑक्सिजनचे (oxygen) प्रमाण मोजू शकता व त्याकरिता स्वतंत्ररित्या पल्स ऑक्सी मीटर (pulse-oxy meter) हे उपकरण घ्यायची गरज नाही, असा व्हॉट्सअॅप मेसेज सध्या व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये मोबाइल ॲप डाउनलोड करायची लिंकही दिलेली आहे. मात्र, हा मेसेज फेक असून करोना महामारीच्या काळात अशा फसव्या मेसेजपासून खबरदार राहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.

वाचा:

महाराष्ट्र सायबर म्हणतं…

१) कृपया अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका.
२) वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अशा मोबाइल ॲप्स वरून ऑक्सिजनच्या प्रमाणाचे आकडे हे अचूक नसतात.
३) मुळात पल्स ऑक्सी मीटर या उपकरणात वापरली गेलेली प्रणाली व या मोबाइल ॲपमधील सॉफ्टवेअर यामध्ये बराच फरक आहे. त्या प्रणालीमध्ये जे वैद्यकीय निकष वापरले गेले आहेत ते या मोबाइल ॲपमध्ये नाहीत.
४) असे मोबाइल ॲप सुरक्षित नाहीत व त्यांचा उपयोग सायबर भामटे तुमच्या मोबाइलमधील सर्व माहिती मिळवण्यासाठी करू शकतात.
५) शक्यतो असे मोबाइल ॲप डाउनलोड करून वापरणे टाळा.
६) जर असे कोणतेही मोबाइल ॲप तुम्ही वापरत असाल तर आपल्या मोबाइलच्या सेटिंग्ज मध्ये जाऊन या ॲप्सना ठराविकच अॅक्सेस अलाव करा.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

  2. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here