डोंबिवली : सेल्फी काढल्याच्या रागातून आईसह मुलीला मारहाण झाल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्या महिलाच होत्या. पूर्वसूचना न देता तू सेल्फी का काढलीस ? असा जाब विचारणाऱ्या आई आणि तिच्या मुलीला दोघा महिलांनी रविवारी सकाळी बेदम मारहाण केली.

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोडला असलेल्या सांगाव-सोनारपाडा येथील श्री क्षेत्र पिंपळेश्वर महादेव मंदिराबाहेर लागलेल्या जत्रेत हा प्रकार घडला. या संदर्भात सांगाव परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच परिसरात राहणाऱ्या दोघी जणींच्या विरोधात मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आई मला खूप मारलंय, डोक्याला विक्स लावताच बेशुद्ध; शेवटचा श्वास घेण्याआधी म्हणाला, सागर….
श्री क्षेत्र पिंपळेश्वर महादेव मंदिर इथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी होती. या काळात तिथे जत्रा भरली होती. तक्रारदार महिला व तिची मुलगी रविवारी महाशिवरात्र असल्याने सांगाव-सोनारपाडा येथील श्रीक्षेत्र पिंपळेश्वर महादेव मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर या महिलेच्या मुलीने तिच्या मोबाईलमधून मंदिर परिसरात सेल्फी काढला. या सेल्फीमध्ये आरोपी महिलेची छबी आली. त्यामुळे आरोपी महिलांनी तक्रारदार आणि तिच्या मुलीला आमचा सेल्फी का काढला ? असे विचारुन मारहाण केली.

यातील एकीने रस्त्यावरील दगड उचलून तक्रारदार महिलेच्या डोक्यात हाणला आणि यात ती जखमी झाली. किरकोळ कारणावरुन भांडण उकरुन काढून मारहाण केल्याच्या आरोपाखाली जखमी झालेल्या महिलेने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत असून दोघी जणींच्या विरोधात मानपाडा पोलिसांनी भादवी कलम ३२४, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

भुताटकीच्या संशयातून दाम्पत्यासोबत घडलं भयंकर; जादूटोणा, तंत्र-मंत्रचा अघोरी खेळ…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here