collector office ratnagiri, काम करत असलेल्या कर्मचाऱ्याने खुर्चीवरच प्राण सोडले, घटनेने जिल्हाधिकारी कार्यालय हळहळले – unfortunate death of an employee working in the collector office an incident in ratnagiri
रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयात खुर्चीवर बसलेल्या कर्मचाऱ्याची हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. या दुर्देवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
गुहागर येथील तहसील कार्यालयातील पुरवठा निरिक्षक प्रकाश पांडुरंग खांडेकर (वय ५४, रा. मुंढरे गुहागर) हे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल शाखेत खुर्चीवर बसलेले होते. अशातच ते बेशुद्ध पडले. अचानक चक्कर आल्यासारखे होऊन ते खुर्चीतच बेशुद्ध पडले. यानंतर त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले. यावेळी त्यांना मृत घोषित करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. कार्यालयीन कामासाठी प्रकाश खांडेकर हे आज सकाळी गुहागर येथून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी ही घटना घडली. ते २०२५मध्ये निवृत्त होणार होते. दरम्यान, घडलेल्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या आठवणी सांगत अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. महिला रस्त्यावर उभी होती, अचानक पांढऱ्या कारमधून काहीजण उतरले, पुढे घडले ते धक्कादायक सरकारी नोकरीला लागण्यापूर्वी खांडेकर हे लष्करात होते. गुहागर तहसील कार्यालयात अनेक जागा रिक्त असून सगळा भार हा पुरवठा निरिक्षक असलेल्या प्रकाश खांडेकर यांच्यावर पडत होता. यापूर्वी त्यांनी खेडमध्येही पुरवठा शाखेत काम केले होते. अत्यंत साधं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. दोन महिन्या पूर्वीच ते आपल्या गावी गुहागरला हजर झाले होते. त्यांच्या मागे आई, पत्नी व दोन मुले, असा मोठा परिवार आहे.