नवी दिल्ली : जीवन देणाऱ्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांनी जीव गमावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पण आताची घटना वाचून तुम्हालाही संताप येईल. दिल्लीतील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांपैकी एक असलेल्या एलएनजेपीमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला. पण काही वेळाने रुग्णालयातील डॉक्टरांनी नवजात अर्भकाला एका पेटीत बंद करून कुटुंबियांच्या ताब्यात दिलं आणि तिचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं.
हे ऐकून सर्व कुटुंबियांना मोठा धक्का बसला. रुग्णालयातच मातेने आणि नातेवाईकांनी हंबरडा फोडला. खरंतर, सुरुवातील यावर कुटुंबियांचा विश्वासच बसला नाहीत. पण नंतर हेच सत्य असल्याचं स्वीकारत ते बाळाला घेऊन घरी आहे. त्यांनी पेटी उघडून अर्भकाला कुशीत घेतलं तोच सगळ्यांना मोठा धक्का बसला. कारण, नवजात अर्भकाचा श्वास सुरू होता. आपलं बाळ जीवित असल्याचं कळताच कुटुंबियांना मोठा आनंद झाला पण तिताच राग आला तो डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा. शंकराच्या मंदिरात आई-मुलीला इतर महिलांकडून बेदम मारहाण, तपासात धक्कादायक कारण समोर यानंतर कुटुंबियांनी रुग्णालयात जात मोठा गोंधळ घातला. पण डॉक्टर आली चूक मान्य करण्यात तयार नव्हते. यानंतर रुग्णालयाने सारवासारव करत बाळा पुन्हा पुढील तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसही या घटनेचा तपास करत असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल वालिद यांच्या पत्नीने रविवारी सायंकाळी एका मुलीला जन्म दिला. काही वेळातच डॉक्टर बाहेर आणि हातामध्ये एक बॉक्स दिला. आपली नवजात मुलगी मरण पावली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यावर कोणालाच विश्वास बसेना. पण घरी जाऊन पेटी उघडताच मुलीचा श्वास सुरू असल्याचं समोर आलं. ही घटना समोर आल्यानंतर दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.