डेहराडून : महाराष्ट्रातून पायउतार झालेले माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यकाळात ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आज सोमवारी त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील राजकीय परिस्थितीवर पहिल्यांदाच भाष्य केले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर अनेक नेत्यांवर चर्चा केली. यावेळी बोलताना कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांचा ‘संत व्यक्ती’ असा उल्लेख केला.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी राज्यपाल कोश्यारी बोलत होते. यावेळी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या वादांवर त्यांना अनेक प्रश्न विचारले गेले. त्यावेळी त्यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली. उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना कोश्यारी म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे हे संत व्यक्ती आहेत. ते राजकारणात फसले. तुम्ही जाणताच आहात उद्धव ठाकरे राजकारणात कशा प्रकारे फसले आहेत. ठाकरे यांना राजकारण किती कळतं हे मी सांगू शकत नाही. कोणाचा ट्रॅप होता हेही मला माहीत नाही. डोक्याने विचार केला असता तर असे झाले नसते’

अदानी समूहाला १३२ अब्ज डॉलर्सचे नुकसान, तरीही ही सरकारी बँक आणखी कर्ज देण्यास तयार
ते पुढे म्हणाले, ‘पाच पानांची चिठ्ठी लिहत आहेत म्हणून मी बोलत आहे. जर उद्धव ठाकरे ही व्यक्ती साधी नसती, सज्जन नसती, राजकारणी असती, शरद पवार यांच्या सारख्या ट्रिक्स जाणत असती, अनुभव असता, तर अशा प्रकारचे लिहू शकली असती का.’

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय व्यक्तींशी माझे चांगले संबंध होते. पण त्यांचे सल्लागार कोण होते. त्यांचे हेच आमदार माझ्याकडे येत म्हणत असत की आम्हाला वाचवा, उद्धव ठाकरे हे शकुनीमामाच्या जाळ्यात अडकले आहेत. माहीत नाही त्यांचा शकुनीमामा कोण.’

बदलापूर स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होता, थोडी डुलकी लागली, डोळे उघडून पाहताच बसला मोठा धक्का
शरद पवारांवर साधला निशाणा

या मुलाखतीत कोश्यारी यांना शरद पवारांसंदर्भातील एक प्रश्न विचारण्यात आला. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपली तक्रार केली होती, असे कोश्यारी यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, ‘पाहा, शरद पवार हे विरोधात आहेत. ते माझी तक्रार काय करणार, ते काही वेगळेच सांगून आले असतील असेही झाले असेल.’

मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बाप थेट पिस्तूल घेऊन न्यायालयात, बुरखा घालून गोळी झाडण्याआधी घडले वेगळे
जर तुम्ही लोकांचे मत जाणून घेतले तर माझ्यावर प्रेम करणारे लोक अधिक सापडतील, असे ते म्हणाले. आपल्या कार्यकाळात माझ्यावर कोणताही दबाव नव्हता असेही त्यांनी स्पष्ट केले. माझ्यावर दबाववगैरे होता का, असा प्रश्न मला विचारूच नका. भगतसिंह यांच्यावर कधी दबाव असू शकतो का. तुम्ही कधी माझ्यावर दबाव पाहिला आहे का. कोठून आला दबाव, असे कोश्यारी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here