मुंबई : प्रख्यात गायक सोनू निगम याला मुंबईत धक्काबुक्की झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नील आणि पुतण्या यांना सोनूसह सेल्फी घ्यायचा होता, त्यावरुनच हा वाद झाल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

तीन दिवसांपासून चेंबूरमध्ये फेस्टिवल सुरू आहे. संगीत मैफिलीसाठी सोनू तिथे आला होता. तिथून निघत असताना स्वप्नील फातर्पेकर याला सोनूसोबत सेल्फी घ्यायचा होता. यावेळी सोनूच्या सुरक्षारक्षकासोबत त्याची बाचाबाची झाली. त्यानंतर सोनूला धक्काबुक्की झाल्याचंही वृत्त आहे.

लाईव्ह कॉन्सर्टनंतर सोनू निगम स्टेजवरुन खाली येत असताना एका व्यक्तीने त्याला पकडले. आक्षेप घेतल्यानंतर त्याने सोनू निगम आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन व्यक्तींना पायऱ्यांवरून ढकलले, त्या दोघांपैकी एक जण जखमी झाला. स्वप्नील फातर्पेकर असे आरोपीचे नाव असल्याची माहिती झोन 6 चे पोलीस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत यांनी दिली.

सोनूसह काही जणांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. सोनू सुखरुप असून त्याचे गुरु गुलाम मुस्तफा खान यांचे सुपुत्र रब्बानी खान, सोनूचा निकटवर्तीय आणि सुरक्षारक्षक यांना दुखापत झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत.

कॉन्सर्ट संपल्यानंतर मी स्टेजवरून खाली येत असताना स्वप्नील प्रकाश फातर्पेकर याने मला धरले. त्यानंतर मला वाचवण्यासाठी आलेल्या हरी आणि रब्बानी यांना त्यांनी धक्काबुक्की केली. तेव्हा मी पायरीवर पडलो. मी तक्रार दाखल केली, जेणेकरून लोकांनी जबरदस्तीने सेल्फी घेण्याबाबत आणि वाद घालण्याबाबत विचार करावा, अशी प्रतिक्रिया सोनू निगमने दिली आहे.

पाहा व्हिडिओ :

विशेष म्हणजे, ज्याच्यासोबत सोनूच्या सुरक्षारक्षकांची बाचाबाची करणाऱ्या स्वप्नीलचे पिता आणि आमदार प्रकाश फातर्पेकरच या फेस्टिव्हलचे आयोजक असल्याची माहिती आहे. चार दिवस सुरु असलेल्या या फेस्टिव्हलची सांगता सोनूच्या परफॉर्मन्सने झाली. आयोजकांच्या टीमपैकी काही जणांनी सोनूची मॅनेजर सायरासोबत गैरवर्तन केल्याचं वृत्तही काही माध्यमांनी दिली आहे.

दिल्लीतल्या एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये नाचले भाईजान आणि खिलाडी, VIDEO व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here