तुर्कीः तुर्कीत सोमवारी मध्यरात्री पुन्हा ६.४ रीश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला आहे. हताय प्रांतात हे धक्के जाणवले असून यानंतर नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. तुर्कीत ६ फेब्रुवारी रोजी विनाशकारी भूकंप आला होता. त्यानंतर एक महिना उलटत नाही तोच दुसरा भूकंप आल्याने पुन्हा देशाची घडी विस्कटली आहे. दरम्यान, यावेळी किती नुकसान झालं आहे याची सविस्तप माहिती समोर आली नाहीये. मात्र, इमारतींना तडे गेल्याचं सांगितलं जातंय. दोन आठवड्यांपूर्वी तुर्की आणि सीरियात आलेल्या भूकंपामुळं ४५ हजार जणांचा मृत्यू झाला होता.

तुर्कीतील एका वृत्तसंस्थेने भूकंपानंतर ३२ आफ्टरशॉक्स नोंदवले गेलेत, अशी माहिती दिली आहे. तर, समुद्रातील लाटा ५० सेमीपर्यंत वाढू शकतात, असा इशाराही आपत्ती व्यवस्थापनेने दिला आहे. भूकंपानंतर दियाबाकिर परिसरातील रहिवाशांना रस्त्यावर धाव घेतली. तर मागील भूकंपावेळी उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचे पुन्हा नुकसान झाले आहे. सोमवारी झालेल्या भूकंपामुळं तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर २१३ जण जखमी झाले आहेत.

तुर्कीत भूकंपानंतर हाहा:कार, होत्याचे नव्हते झाले; ७२ तासांत तंतोतत खरी ठरली भविष्यवाणी
तुर्कीत सोमवारी झालेल्या भूकंपाची तीव्रता ६.४ रीश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. पुन्हा झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कारण दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या भूकंपामुळं संपूर्ण देश उद्ध्वस्त झाला होता. यावेळी भारतातून भूकंपग्रस्तांसाठी मदत पोहोचवली गेली होती. भूकंप होऊन आठ दिवस उलटून गेले होते तरी देखील मलब्याखालून काही जिवंत व्यक्ती सापडत होते. अद्यापही तुर्कीतील जनजीवन रुळावर येण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसल्याने मदतकार्यास अडथळा निर्माण झाला आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अर्थात ‘एनडीआरएफ’च्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ‘तुर्कीमध्ये सध्या १०० जण कार्यरत असून, गाझियान्टेप आणि उर्फा भागामध्ये मदतकार्य सुरू आहे.

विनाशकारी भूकंपानंतर १० फूट पुढे सरकला तुर्की; पृथ्वीला धोका किती?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here