नवी दिल्ली : अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्स अँड सेझने १५०० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली. सोबतच कंपनीने आणखी कर्जाच्या परतफेडीचे आश्वासन दिले आहे. अमेरिकेची शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चचा नकारात्मक अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर समूहाच्या शेअर्समध्ये तुफान घसरण झाली. बहुतांश कंपन्यांचे शेअर्स निम्म्याहून अधिक खाली घसरले. अदानी पोर्ट्सने एसबीआय म्युच्युअल फंडला १,५०० रुपयांच्या कर्जाची परतफेड केली असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले तसेच कंपनी आणखी एक हजार कोटी रुपयांची परतफेड करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

कंपनीने निश्चित कालावधीच्या आधीच कर्जाच्या हप्त्याची परतफेड सध्याच्या रोखीतून आणि कामकाजातून करण्यात आली आहे. अशी माहिती कंपनीने दिली आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूह गुंतवणुकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहे. कर्जाच्या परतफेडीचे हे पाऊल देखील याच प्रयत्नांचा एक भाग आहे.

अदानी समूहाला १३२ अब्ज डॉलर्सचे नुकसान, तरीही ही सरकारी बँक आणखी कर्ज देण्यास तयार
आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये अदानी समूहाचे बिघडलेले वातावरण बदलण्यासाठी Kekst CNC ची ग्लोबल कम्युनिकेशन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासह कंपनीने अमेरिकन लॉ फर्म Wachtell, Lipton, Rosen आणि Katz यांना शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडनबर्ग रिपोर्टच्या आरोपांविरुद्ध कायदेशीर लढाई लढण्यासाठी नियुक्त केले आहे.

Adani Net Worth: १७ दिवसातच डाव उलटला! गौतम अदानींच्या नेटवर्थ वाढीला ब्रेक, कंपन्या बॅकफूटवर
अदानी समूहावर किती कर्ज?
अदानी समूहावर सप्टेंबर २०२२ पर्यंत एकूण २.२६ लाख कोटी रुपयांचे कर्ज आणि ३१ हजार ६४६ कोटी रुपयांची रोख रक्कम होती. अदानी समूहाच्या कर्जाबाबत गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, ज्याचे कंपनी निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. अदानी समूहाने अलीकडेच डीबी पॉवर ७००० कोटी रुपयांना खरेदी करण्याचा निर्णय रद्द केला. यानंतर कंपनी कर्ज फेडण्यासाठी रोडमॅप तयार करत आहे.

दिलासादायक! ‘अदानी’ शेअर देतोय वेगवान परतावा, तिसऱ्या दिवशी तेजी, वाचा कमाईदार स्टॉकची स्थिती
अदानी पोर्ट्सचे पुढील लक्ष्य
अदानी पोर्ट्स आणि सेझने ८ फेब्रुवारी रोजी सांगितले होते की, कंपनी एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात पाच हजार कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करतील. कंपनी पुढील महिन्यात ५०० दशलक्ष डॉलरच्या ब्रिज कर्जाची परतफेड करेल. या महिन्याच्या सुरुवातीला, फ्रेंच तेल कंपनी टोटल एनर्जीने स्वतंत्र ऑडिट अहवालानंतरच अदानी समूहाच्या ग्रीन हायड्रोजन योजनेत ५० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here