जळगाव जिल्हा प्रशासनाला गुरुवारी तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यात २६७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात सर्वाधिक ८६ रुग्ण हे एकट्या जळगाव शहरातील आहेत. जळगाव ग्रामीण २३, ८, अमळनेर ४, चोपडा १६, पाचोरा १८, भडगाव ७, धरणगाव ९, यावल १२, एरंडोल ५, जामनेर ३४, रावेर २, पारोळा १५ , २८ असे नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादयक बाब म्हणजे आज मुक्ताईनगर व बोदवड येथे आज एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
जळगाव जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सद्यस्थितीत १० हजार ८५८ इतकी झाली आहे. त्यातील ७ हजार २८७ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. गुरुवारी २७१ जणांना डिस्चार्ज मिळाला. तर ३ हजार ६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गुरुवारी दिवसभरात १३ जणांचा करोनामुळे मृ्त्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ३, अमळनेर, यावल व जळगाव तालुक्यातील प्रत्येकी २ जण तर पाचोरा, चोपडा, पारोळा व रावेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ५०६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
I like the valuable information you provide in your articles.
Thank you ever so for you article post.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.