नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात मागणीत घट झाल्यामुळे मंगळवारी सोने आणि चांदीच्या भावात घट नोंदवण्यात आली आहे. अमेरिकन डॉलरच्या तेजीमुळे आणि आगामी बैठकीत फेड रिझर्व्हच्या दरवाढीच्या भीतीमुळे सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरणीचा कल सुरूच राहिला. आज सकाळच्या सत्रात सोन्याचा भाव पाच आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला पण देशांतर्गत बाजारात सोने अजूनही ५६ हजार प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर टिकून आहे. मौल्यवान सोन्याची किंमत आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर रु. ५६,१९१ प्रति १० ग्रॅमवर घसरून उघडली आणि देशांतर्गत बाजारात रु. ५६,१०४ च्या इंट्राडे नीचांकावर गडगडली.

सोने-चांदीचा आजचा प्रतितोळा भाव
मंगळवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) एप्रिल २०२३ मध्ये डिलिव्हरीसाठी असलेल्या सोन्याचा भाव ७३ रुपये किंवा ०.१३ टक्क्यांनी कमी होऊन ५६ हजार १४० रुपये प्रति १० ग्रॅम होता. तर मागील सत्रात एप्रिल करारासाठी असलेल्या सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ५६ हजार २१३ रुपये होता. दुसरीकडे, एमसीएक्सवर, मार्च २०२३ मध्ये डिलिव्हरीसाठी चांदी १९४ रुपये किंवा ०.३०% घसरून ६५ हजार ५५५ रुपये प्रति किलोवर व्यापार करत होती. तर मागील सत्रात मार्च कराराच्या चांदीचा भाव ६५ हजार ७४९ रुपये प्रति किलो होता.

नोकरदारांसाठी मोठी खुशखबर! निवृत्तीनंतर वाढीव पेन्शनला ‘ग्रीन सिग्नल’, EPFO ची नियमावली जारी
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचा भाव

जगातील पातळीवर सोन्याचा भाव घसरणीसह उघडला. आंतरराष्ट्रीय स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा भाव १,८४१ डॉलर प्रति औंस पातळीवर खुला झाला आणि $१,८४३.७५ च्या उच्च पातळीवर पोहोचला. पण त्याला आपले उच्च स्तर टिकून ठेवण्यात अयशस्वी झाले आणि सकाळच्या सत्रात किंचित सुधारणा होत भाव इंट्राडेवर नीचांकी १,९३७ डॉलरवर पोहोचला.

वाचवाल तर कमवाल! एफडीवर मिळणार आता अधिक व्याज, इतके टक्के मिळणार व्याज
एका क्लिकवर अशी तपासा किंमत
तुम्हाला देखील सोनाराकडे खरेदीला जाण्यापूर्वी सोने आणि चांदीचे नवीन दर जाणून घ्यायचे असतील, तर तुम्ही फक्त मिस कॉल देऊन किमती जाणून घेऊ शकता. १८ आणि २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची किरकोळ किंमत जाणून घेण्यासाठी तुम्ही ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल देखील सोन्याचा भाव जाणून घेऊ शकता. मिस्ड कॉल दिल्यावर काही मिनिटांनी तुम्हाला एसएमएसद्वारे नवीन दर समजतील. याशिवाय तुम्ही सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here