पाटणा : जिथे भावाचा बुडून मृत्यू झाला होता, तिथेच बहिणीनेही आपल्या आयुष्याची अखेर केल्याची हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे. बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात दाहा नदीत उडी घेत किशोरवयीन तरुणीने आत्महत्या केली. रविवारी सकाळी या घटनेची माहिती गावकऱ्यांनी दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. नदीतून तरुणीचा मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. त्यानंतर तो कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. मयत तरुणी लछवार गावातील मिथलेश गिरी यांची कन्या होती.

२०१६ मध्ये मिथलेश गिरी यांचा १६ वर्षीय मुलगा आकाश गिरी याचा मृत्यू झाला होता. आंघोळीसाठी आकाश दाहा नदीत उतरला होता, यावेळी पाण्यात बुडून त्याला प्राण गमवावे लागले होते. योगायोगाची गोष्ट म्हणजे दाहा नदीत त्याच ठिकाणी त्याची धाकटी बहीण निशू कुमारी हिनेही मृत्यूला कवटाळलं. पंचक्रोशीत या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे.

२३ सप्टेंबर २०१६ रोजी जिऊतिया (उत्तर भारतीय सण) या दिवशी १६ वर्षांचा आकाश हा दाहा नदीत आंघोळ करत होता. यावेळी पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. आकाशच्या मृत्यूसमयी त्याची धाकटी बहीण निशू अवघ्या दहा वर्षांची होती. दादाच्या मृत्यूचा तिच्या मनावर गंभीर परिणाम झाला.

आकाश आणि निशू यांचं प्रेमाचं नातं होतं. दादाच्या मृत्यूनंतर ती सारखी नदीच्या दिशेने धावत जायची. ‘मला दादा बोलवतोय’ असं ती म्हणायची. वडिलांनी तिला डॉक्टरांकडे उपचारासाठी नेलं. त्यानंतर तिचं मानसिक आरोग्य काहीसं सुधारलं. मात्र सहा वर्षांनी त्याच ठिकाणी तिने जीवाचं बरं वाईट करुन घेतलं.

आई-बाबांना मदत करण्यास शेतात गेली, १७ वर्षीय युवतीला सर्पदंश, तडफडून प्राण सोडले
महाशिवरात्री निमित्त शिव मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी शनिवारी सकाळी कुटुंबातील सर्व सदस्य गेले होते. घरी निशूचे काका होते. निशू लहान मुलांसोबत खेळत होती. रविवारी सकाळी आठ वाजता ती घरातून बाहेर पडली. मंदिरातून परतल्यावर कुटुंबीयांनी निशूचा शोध सुरु केला. रात्रभर शोधाशोध करुही ती कुठेच सापडली नाही.

संसारगाठ पाचव्याच दिवशी सुटली, हळद उतरण्याआधीच नवविवाहितेचा मृत्यू, लग्नघरावर शोककळा
बलभद्र पटी गावातील मच्छिमार मासे पकडण्यासाठी दाहा नदीत गेले, तेव्हा त्यांनी तरुणीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहिला. वयाच्या १६ व्याच वर्षी दोन्ही भावंडांचा मृत्यू झाला. एकाच ठिकाणी दोघा भावंडांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र आश्चर्य आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

राळेगणसिद्धी गहिवरले! शहीद कॅप्टन सौरभ औटी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here