रायगड : नेरुळ सिग्नलपासून पुढे काही अंतरावर रविवारी झालेल्या भीषण अपघातात एका २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घरी आईसोबत झालेला त्याचा कॉल शेवटचा ठरला. कारण भर रस्त्यात निर्भयला भरधाव कारने उडवल्यामुळे त्याचा अंत झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पुढच्याच महिन्यात तो प्रेयसीसोबत विवाहबंधनात अडकणार होता, मात्र त्याआधीच नियतीने त्याच्यावर घाला घातला.

निर्भय पाटील असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो पनवेलमधील करंजाडेमध्ये परिसरात राहत होता. आपली दुचाकी घेऊन निर्भय पाम बीच मार्गे वाशीकडे येत होता. मध्येच आईचा फोन आल्याने नेरूळ सिग्नलपासून पुढे काही अंतरावर त्याने आपली दुचाकी थांबवली आणि तो आई सोबत फोनवर बोलत होता. मात्र हाच कॉल निर्भयचा शेवटचा कॉल ठरला.

या मार्गावर येणाऱ्या एका भरधाव कारने निर्भयला जबरदस्त धडक दिली आणि तो गाडीवरून दूर उडून जबर जखमी झाला. ही धडक इतकी भीषण होती की, निर्भय कारवर आदळून दुभाजकाला धडक देत झाडीमध्ये फेकला गेला.

खेदाची बाब म्हणजे निर्भय पुढच्याच महिन्यात आपल्या प्रेयसी सोबत लग्नगाठ बांधणार होता. या वृत्ताने पाटील कुटुंबियांवर मोठा आघात झाला असून करंजाडे परिसरातही शोक व्यक्त होतोय.

या प्रकरणी बेफाम कार चालक राज साळुंखे याच्या विरोधात सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्भय आपली MH ४६ CB १४६४ दुचाकी घेऊन नेरूळला मामाकडे गेला होता. तेथून तो आपल्या बहिणीकडे पाम बीच मार्गे वाशीकडे येत होता.

संसारगाठ पाचव्याच दिवशी सुटली, हळद उतरण्याआधीच नवविवाहितेचा मृत्यू, लग्नघरावर शोककळा
नेरूळ सिग्नलजवळ सीबीडीकडून वाशीकडे जाणारा कार चालक राज साळुंखे याने बेफाम कार पळवत असताना समोरील रिक्षाला धडक टाळण्यासाठी कार डावीकडे वळवली. यावेळी कार रस्त्याबाहेर जाऊन सुरक्षा कठड्याला आदळून फोनवर बोलत उभे असलेल्या निर्भयलाही धडकली.
जिथे दादाचा जीव गेला, तिथे बहीण सारखी जायची, सहा वर्षांनी त्याच जागी मृत्यूला कवटाळलं
ही धडक निर्भय पाटीलच्या वर्मी लागली. यावेळी प्रत्यक्षदर्शी व्यक्तींनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

‘वाजले की बारा’वर काकांचा बेफाम डान्स; जीन्स-शर्टवरच थिरकले लावणीवर, लग्नातला व्हिडीओ व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here