मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलं आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केल आहे.

संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना लिहिलेले पत्र आपल्या ट्विटटर हँडलवरून ट्विट केले आहे. आपली सुरक्षा हटवण्यात आल्याचा उल्लेखही संजय राऊत यांनी केला आहे.

राऊत यांनी काय लिहिलं आहे पत्रात?

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच माझी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे हटविण्यात आली. याबाबत मी आधीच आपल्याला कळविले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच त्यांनी पोसलेल्या गुंड टोळ्यांकडून मला धमक्या देण्याचे प्रकार घडले. मी त्याबाबतही आपणास वेळोवेळी कळविले आहे. आजच माझ्याकडे पक्की माहिती आली आहे की, ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, ‘सामना’चा कार्यकारी संपादक, शिवसेना नेता असलो तरी एक जबाबदार नागरिक म्हणून ही माहिती आपणास देत आहे.

sanjay gandhi letter to devendra fadnavis

सजंय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र

केंद्रीय निवडणूक आयोग्याच्या निकालासाठी २००० कोटींचा गैरव्यवहार?

केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल देत शिवसेना पक्ष आणि चिन्ह हेशिंदे गटाला दिले. शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. या निर्णयावरून संजय राऊत यांनी टीका केली होती. या निकालासाठी २००० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावरून शिवसेनेतील (शिंदे गट) नेते, आमदार आणि खासदारांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतरही संजय राऊत यांच्याकडून शिंदेवर टीका आणि आरोप करण्यात येत होते. यामुळे वातावरण तापलं आहे. आता संजय राऊत यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here