नागपूर: उपराजधानी शहरातील बहुचर्चित दीडशे कोटी रुपयांच्या समृद्धी महाघोटाळ्यात गत १३ वर्षांपासून पसार असलेल्या तत्कालीन अध्यक्षाला सीआयडीने गुरुवारी अटक केली. वय ५८ रा. प्रिन्स अपार्टमेंट, छत्रपती चौक, असे अटकेतील अध्यक्षाचे नाव आहे. ( )

वाचा:

२००७ मध्ये कंपनीत दीडशे कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये अध्यक्षासह ५६ जणांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. कालांतराने या महाघोटाळ्याचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला. सीआयडीने ५२ जणांना अटक केली. किशोर ठाकरे व अन्य तिघे मात्र या प्रकरणात फरार होते.

वाचा:

किशोर ठाकरे हा छत्रपती चौकात असल्याची माहिती सीआयडीला मिळाली होती. सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक , उप महानिरीक्षक जालिंदर सुपेकर, अधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक श्रीशैल गजा व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून ठाकरे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

दरम्यान, किशोर ठाकरे हा गेल्या १३ वर्षांपासून यंत्रणांना सतत गुंगारा देत होता. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आल्यानंतरही मुख्य आरोपी हाती लागू शकला नव्हता. आता ठाकरे जाळ्यात अडकल्याने या घोटाळ्याचा खडानखडा तपशील हाती लागणार आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here