जालना : यंदा पाऊस चांगला पडलेला असल्यामुळे गावातील तळ्यात मुबलक पाणीसाठा आहे. उन्हाचा चटका वाढू लागल्याने गावातील तरुण तळ्यावर पोहण्यासाठी जातात. अशाच प्रकारे काही तरुण मासेमारीसाठी तळतोंडी शिवारातील तलावात गेले होते. पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज येतो. त्यामुळे प्रसंगावधान राखूनच ते पाण्यात उतरतात. मात्र नवशिके किंवा त्या भागाची माहिती नसलेल्या नवख्या पोहणाऱ्याला धोका होण्याची शक्यता जास्त असते. अशीच घटना परवा या तरुणाच्या बाबतीत घडली.

मासेमारी करण्याच्या इराद्याने सचिन राक्षे हा तरुण पाण्यात उतरला खरा, पण पाण्याचा अंदाज न आल्यानं सचिन राक्षे हा तरुण काही कळायच्या आतच पाण्यात बुडाला. तो दिसू न लागल्याने त्याच्या सोबतच्या गावातील अन्य तरुणांनी त्याचा शोध सुरू केला. काहींनी पाण्यात उड्या मारून शोध घेण्याचा प्रयत्नही केला. पण त्यांना यश आले नाही.

मटा इम्पॅक्ट: लोकशाहीची व्याख्या सांगणाऱ्या चिमुकल्याला नवी दृष्टी, डॉ. लहानेंकडून डोळ्यांची तपासणी
घटनेची माहिती वाऱ्यासारखी तळतोंडी गावात पसरली. ही धक्कादायक माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ तळ्यावर दाखल झाले होते. कालपासून सचिनचा शोध घेण्याची मोहिम सुरू होती. तरीही सचिनचा शोध लागेना. अखेर घटनास्थळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले होते. सोमवारी सकाळी ९ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली. परंतू तरुणाचा शोध लागला नाही.
Jalna News: तो प्रेमात पडला पण तिने घात केला, आईच्या मदतीने पैसे उकळले; हताश झालेल्या प्रियकराने आयुष्य संपवलं
अखेर तहसीलदार मंठा यांच्या मार्फत राज्य आपत्ती कृती दलाच्या पथकाची (SDRF) मागणी करण्यात आली होती. अखेर अग्निशमन दलाकडून आज सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. २ दिवसांपूर्वी पाण्यात बुडालेल्या सचिन हरिभाऊ राक्षे या तरुणाचा मृतदेह आज दुपारी तलावातून बाहेर काढण्यात आला आणि शोध मोहीमेत प्रशासनाला यश आले. या शोध मोहीमेत अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे, फायरमन संतोष काळे, विठ्ठल कांबळे, सागर गडकरी, नितीश ढाकणे, वाहन चालक विनायक चव्हाण यांनी प्रयत्न केले. सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बोटीच्या साह्याने गळ टाकून शोध घेतला. परंतू सचिनचा मृतदेह आढळून न आल्याने पुन्हा अग्निशमन दलाने शोध मोहीम सुरू केली होती. सचिनचा मृतदेह पाण्यातून काढल्यानंतर त्याचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांवर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here