नवी दिल्ली: कलम ३७० च्या मुद्द्यावर पाकिस्तानची री ओढणाऱ्या तुर्कस्ताननं आता तिरकी चाल खेळली आहे. भारतातील मुस्लिमांच्या ‘ब्रेन वॉशिंग’साठी आणि भारतविरोधी कारवायांसाठी तुर्कस्तानमधून मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला जात आहे. इतकंच नाही तर, पाकिस्ताननंतर आता तुर्कस्तान हे ‘भारतविरोधी कारवायांचे’ दुसरे सर्वात मोठे केंद्र होऊ पाहत आहे. एका रिपोर्टनुसार, आणि काश्मीरसह देशातील बहुतांश भागातील कट्टर मुस्लीम संघटनांना तुर्कस्तानमधून वित्तपुरवठा केला जात आहे.

केंद्रातील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने एका इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. तुर्कस्तानकडून भारतात मुस्लीम संघटनांना वित्तपुरवठा आणि कट्टरतावाद्यांची भरती करण्याचा प्रयत्न होत आहे. दक्षिण आशियाई मुस्लिमांवर आपला प्रभाव वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मुस्लीम देशांचा नेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचे राष्ट्रपती एर्दोआन यांचे स्वप्न आहे, असेही त्यात म्हटले आहे. एर्दोआन यांनी काही दिवसांपूर्वीच ऐतिहासिक हगिया सोफिया संग्रहालयाचं रुपांतर मशिदीत केलं आहे. हे संग्रहालय १४५३ पर्यंत चर्च होते. एर्दोआन हे मुस्लीम जगतात सौदी अरेबियाच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा वारंवार प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी मलेशियाचे तत्कालीन पंतप्रधान महातीर मोहम्मद आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सोबत हातमिळवणी करून बिगर-अरेबियन मुस्लीम देशांची एक संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता.

एर्दोआन आपल्या राजकीय अजेंड्यानुसार, दक्षिण आशियाई मुस्लीम, विशेषतः भारतीय मुस्लिमांवर तुर्कस्तानचा प्रभाव वाढवू पाहत आहेत, असं भारतीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तुर्कस्तानचं सरकार सय्यद अली शाह गिलानी यांच्यासारख्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांना अनेक वर्षांपासून वित्तपुरवठा करत आहे. अलीकडेच त्यांनी काश्मीरव्यक्तीरिक्त देशातील बहुतांश भागात कट्टरतावादी संघटनांसाठी वित्तपुरवठा केला आहे. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या, असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

झाकीर नाईकलाही कतारमार्गे पाठवले पैसे

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पाकिस्तानशी हातमिळवणी करून तुर्कस्तानने वादग्रस्त धर्मोपदेशक झाकीर नाईकलाही कतारमार्गे वित्तपुरवठा केला आहे. भारताला तो हवा आहे आणि सध्या तो मलेशियात राहत असल्याचे सांगितले जाते. तुर्कस्तान आता भारतविरोधी कारवायांचं ‘हब’ झालं आहे, असंही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

केरळमधील कट्टर मुस्लीम संघटनांना फंडिंग

एर्दोआन सरकार भारतातील तरुणांना कट्टरतावादी बनवण्यासाठी कट्टरपंथीयांची भरती करण्याकरिता पैसा पुरवत आहे. याशिवाय कट्टरपंथीयांना तुर्कस्तानमध्ये येण्यासाठी पैसा खर्च करत आहे. काही महिन्यांपूर्वी तुर्कस्तानने केरळमधील एका कट्टर मुस्लीम संघटनेला पैसाही दिला आहे, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here