कॅनबेरा: गेल्या काही वर्षांपासून जगभरात स्पर्म डोनेशनचं प्रमाण वाढलं आहे. याच विषयावर बेतलेला विकी डोनर नावाचा चित्रपट १० वर्षांपूर्वी येऊन गेला. त्यात अभिनेता आयुष्यमान खुराना मुख्य भूमिकेत होता. विकी खुरानाची भूमिका त्यानं साकारली होती. चित्रपटाचा नायक असलेला विकी स्पर्म डोनर असतो. त्याच्यामुळे अनेक पालकांचं आई, वडील होण्याचं स्वप्न पूर्ण होतं. चित्रपटाच्या उत्तरार्धात विकी या सगळ्या मुलांना भेटतो. त्या चिमुकल्यांसाठी डॉक्टरांनी पार्टी आयोजित केलेली असतो. त्या पार्टीत विकी त्या मुलांच्या पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतो. ते पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू तरळतात. ऑस्ट्रेलियात अशीच काहीशी घटना घडली. पण त्यावेळी तिथे विकी डोनर हजर नव्हता.

ऑस्ट्रेलियाचा विकी डोनर सध्या मीडिया आणि सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. हा डोनर ६० मुलांचा बाप आहे. विशेष म्हणजे या सर्वच्या सर्व ६० मुलांचा चेहरा त्याच्यासारखाच आहे. सगळ्या मुलांची चेहरेपट्टी अगदी हुबेहूब आहे. ही सगळी मुलं एका पार्टीत भेटली. मुलांचे चेहरे एकसारखेच असल्याचं पाहून त्यांचे पालक चकीत झाले.
प्राचार्या बेलपत्र तोडत होत्या, विद्यार्थी मागून आला, पेट्रोल टाकून पेटवलं; कारण ठरली एक…
डोनरनं त्याचं स्पर्म एलजीबीटीक्यू समुदायातील अनेक सदस्यांना दान केले होते. एकावेळी केवळ एकाच डोनरच्या स्पर्मचा वापर केला जाऊ शकतो, असा नियम आहे. मात्र या डोनरनं त्याची ओळख लपवून चार वेगवेगळ्या नावांनी अनेक पालकांना स्पर्म डोनेट केलं. हा घोळ कोणाच्याच लक्षात आला नाही. कारण वेगवेगळ्या ठिकाणी मुलं जन्मास येत होती.
भीषण! भयंकर!! जमिनीवर पाडलं, लचके तोडले, फरफटवलं; कुत्र्यांचा चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला
सगळं सुरळीत सुरू असताना अचानक त्याचं बिंग फुटलं. जन्मानंतर काही वर्षांनी ६० मुलं एका ठिकाणी पार्टीला जमली. त्यावेळी मुलांचे चेहरे पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. त्यांचे चेहरे अगदी सारखेच दिसत होते. त्यामुळे त्यांचे पालक चक्रावले. मुलांच्या आई, वडिलांचा एकमेकांशी काहीच संबंध नव्हता. त्यामुळे पालक बुचकळ्यात पाडले. त्यांनी रुग्णालय गाठलं. त्यावेळी या सगळ्याचा उलगडा झाला. सर्वच लहान मुलांचा बाप एकच असल्याचं पालकांना रुग्णालयातून समजलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here