सध्याच्या घडीला अनेक बलाढ्या कंपन्यांमधून कर्मचारी कपात सुरू आहे. आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. कंपनीसाठी कित्येक वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मात्र एका कंपनीला कामासाठी कर्मचारी मिळत नाहीएत. महिन्याकाठी ४ लाख रुपये मोजण्याची कंपनी तयार आहे. मात्र तरीही कंपनीला उमेदवार सापडलेले नाहीत.

स्कॉटलंडच्या एबरडीन समुद्र किनाऱ्यापासून जवळ नोकरीचं ठिकाण आहे. या ठिकाणी पाच जागा रिक्त आहेत. समुद्रातील विहिरीतून वायू आणि खनिज तेल काढण्याचं काम इथे चालतं. त्याच कामासाठी कंपनीला माणसं हवी आहेत. समुद्रातील तेलविहिरींवर काम जोखमीचं आणि जिकिरीचं असतं. विहिरी खणायच्या, त्यातून तेल, वायू काढायचा आणि मग तो तेलशुद्धीकरण केंद्रात पाठवायचा, हे काम समुद्रातील तेलविहिरींमध्ये चालतं.
प्राचार्या बेलपत्र तोडत होत्या, विद्यार्थी मागून आला, पेट्रोल टाकून पेटवलं; कारण ठरली एक…
स्कॉटलंडमध्ये असलेल्या नोकरीचं ठिकाण नॉर्थ सीच्या आसपास आहे. कामाचा अवधी १ ते ६ महिने आहे. कर्मचाऱ्याला कमाल ६ महिने सलग काम करावं लागेल. यासाठी महिन्याकाठी ४ लाख रुपये पगार देण्यात येईल. कर्मचाऱ्याला दिवसातील १२ तास काम करावं लागेल. कर्मचाऱ्यानं दोन वर्षांपर्यंत नोकरी केल्यास, ६-६ महिन्यांची शिफ्ट प्रत्येक शिफ्ट केल्यास त्याचं वेतन १ कोटीपर्यंत जाईल. कंपनीनं स्वत:चं नाव जाहीर केलेलं नाही. पण कंपनी ऊर्जा क्षेत्रातील एक मोठी संस्था आहे.
भीषण! भयंकर!! जमिनीवर पाडलं, लचके तोडले, फरफटवलं; कुत्र्यांचा चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला
योग्य उमेदवाराकडे तांत्रिक आणि सुरक्षेचं प्रशिक्षण घेतलेलं असावं. बीओएसआयईटी म्हणजेच बेसिक ऑफशोर सेफ्टी इंडक्शन अँड इमर्जन्सी ट्रेनिंग, एफओईटी म्हणजेच अतिरिक्त ऑफशोर इमर्जन्सी ट्रेनिंग, सीए-ईबीएस म्हणजेच कंप्रेस्ड एअर इमर्जन्सी ब्रिथिंग सिस्टिम आणि ओजीयूके मेडिकल ट्रेनिंग आवश्यक आहे. कंपनीनं या पदांसाठी २४ दिवसांपूर्वी जाहिरात दिली आहे. पण त्यांना अद्याप तरी योग्य उमेदवार सापडलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here