अमरावती: नागपूर वरून अमरावतीकडे जाणाऱ्या एसटी बसची समोरच्या ट्रकला धडक लागल्याने भीषण अपघात घडला. या घटनेत एसटी बसमधील तब्बल ३३ प्रवासी जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळझिरा जवळ घडली. या घटनेने प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. या प्रवाशांनी स्वत:च्या डोळ्याने समोरुन मृत्यू येताना पाहिला. मात्र, दैव बलवत्तर म्हणून ते थोडक्यात बचावले.

अचानक घडलेल्या या घटनेने प्रवाशांमध्ये काही वेळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अपघात घडताच जखमी प्रवाशांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नशेच्या अग्नीत प्रेम स्वाहा; पतीला सोडून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेला प्रियकरानेच संपवलं
नेमका अपघात कसा घडला?

अकोट आगाराची नागपूर अकोट एम. एच. ४०, ए. क्यू. ६४३३ क्रमांकाची एसटी बस प्रवासी घेऊन नागपूर येथून अमरावतीकडे जात होती. मात्र, पिंपळझिरा जवळ एसटी बस समोर असलेल्या ट्रक क्र. एम. एच. २०,बी. टी. ७२८८ ला एसटी ने मागून जबरदस्त धडक दिली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ माजला. काहीकाळ कोणाला कळेच ना की काय झालंय. या अपघातात ३३ प्रवाशांना दुखापत झाली आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही प्राणहानी झालेली नाही. तरी या घटनेने प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला होता.

जीभेला मधमाशी चावली, मग थेट घशात गेली; विचित्र प्रकारातून तरुण शेतकऱ्याचा अंत, जळगाव सुन्न
नवनीत राणांनी रुग्णालय गाठून जखमींची विचारपूस केली

या घटनेची माहिती नांदगाव पेठ पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांचेसह कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. जखमी प्रवाशांना रुग्णवाहिका तसेच, इतर वाहनांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना मिळताच त्यांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय गाठलं. तिथे त्यांनी या भीषण अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची विचारपूस केली. तसेच, वैद्यकीय चमूशी संवाद साधून जखमींची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देखील नवनीत राणा यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here