sansad ratna from maharashtra, Sansad Ratna: संसद रत्न पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील ४ खासदारांना नामांकन; भाजपच्या २ तर… – nomination of 4 mps from maharashtra for sansad ratna award 13 others nominated full list
नवी दिल्ली: २०२३च्या संसद रत्न पुरस्कार साठी १३ खासदारांचे नामांकन जाहीर झाले आहे. यात काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, राजदचे मनोज झा, माकपाचे जॉन ब्रिटाससह १३ जणांचा समावेश आहे. हा पुरस्कार देणाऱ्या प्राइम प्वायंट फाउंडेशनने दिलेल्या माहितीनुसार या वर्षी ज्या १३ जणांना नामांकन देण्यात आले आहेत त्यात लोकसभेचे ८ आणि राज्यसभेच्या ५ सदस्यांचा समावेश आहे. यातील ३ सदस्य हे निवृत्त झाले आहेत.
केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या अध्यक्षतेखाली माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस कृष्णमूर्ती सह अध्यक्ष असलेल्या समितीने नामांकन केलेल्यामध्ये विदयुत बरन महतो (भाजप), डॉ. सुकांत मजुमदार (भाजप), कुलदीप राय शर्मा (काँग्रेस), डॉ.हीना विजय कुमार गावीत, गोपाळ शेट्टी (भाजप), सुधीर गुप्ता (मध्य प्रदेश), अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांचा समावेश आहे. या समितीमध्ये वरिष्ठ खासदार आणि सर्वसाधारण जनतेमधील सदस्यांचा समावेश होता. एकच इच्छा, पाकिस्तानने दणदणीत विजय मिळवावा; टीम इंडियाची वर्ल्डकप जिंकण्याचे समीकरण… या सर्व लोकप्रतिनिधींना विविध विभागात त्यांच्या कामगिरीनुसार नामांकन देण्यात आले आहे. ज्यात खासगी विधेयक, चर्चेतील सहभाग आदींचा समावेश आहे. या शिवाय राज्यसभेवर असलेल्या सदस्यांमध्ये जॉन ब्रिटास, मनोज झा आणि फौजिया खान यांना नामांकन मिळाले आहे. निवृत्त खासदारांपैकी विशंभर निषाद आणि छाया वर्मा यांना नामांकन मिळाले आहे.