नवी दिल्ली: आठवड्यात फक्त ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टी हा फॉर्म्युला हिट ठरला आहे. जगातील सर्वात मोठा प्रयोग म्हणून याची सुरुवात ब्रिटनमध्ये झाली होती. ज्याचा अहवाल मंगळवारी प्रकाशित झाला. या अहवालात ४ दिवस कामाचा प्रयोग अतिशय यशस्वी झाल्याचे म्हटले आहे.

या प्रयोगात सहभागी झालेल्या अधिकतर कंपन्यांनी यापुढे ४ दिवस कामाचा फॉर्मेट स्विकारणार असल्याचे जाहीर केले आहे. याचा अर्थ यापुढे संबंधित कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना आठवड्यातून ३ दिवस सुट्टी मिळेल. ब्रिटनमध्ये हा प्रयोग पायलट प्रोजेक्ट म्हणून गेल्या वर्षी जून मध्ये सुरू करण्यात आला होता. यात वेगवेगळ्या सेक्टर्समधील एकूण ६१ कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

‘फोर डे वीक ग्लोबल’, ‘फोर डे वीक युके कॅपेंन’ आणि ‘ऑटोनॉमी’ या स्वयंसेवी संस्थेकडून हा प्रयोग सुरू करण्यात आला होता. यात ३ हजार कर्मचाऱ्यांना ५ दिवसाचे काम चार दिवसात संपवण्याचे आदेश दिले होते. या प्रयोगावर ऑक्सफर्ड आणि केम्ब्रीज विद्यापीठातील शिक्षक आणि विद्यार्थी लक्ष ठेवून होते. बोस्टन कॉलेजचे मुख्य रिसर्च प्रमुख प्राध्यापक ज्युलियट स्कोर म्हणाले, विविध कार्यालयातील या प्रयोगाचे निकाल अपेक्षे प्रमाणे मिळाले. हा एक नवा प्रयोग होता आणि काही कंपन्यांसाठी योग्य दिशा देणारा ठरला.

सुनील गावस्कर प्रचंड संतापले; म्हणाले, …तुमची लायकी नाही, पाहा घडलं तरी काय?
अहवालानुसार या ट्रायल मध्ये सहभागी झालेल्या अधिकतर कंपन्यांनी यापुढे ४ दिवस काम हा फॉर्म्युला कायम ठेवायचे ठरवले आहे. आकडेवारीत बोलायचे झाले तर ९१ टक्के कंपन्यांनी ४ डे वर्किंग आणि ३ डे लिव्ह हे धोरण स्विकारणार असल्याचे म्हटले आहे. फक्त ४ टक्के कंपन्यांनी हा फॉर्म्युला योग्य नसल्याचे म्हटले आहे.

एकच इच्छा, पाकिस्तानने दणदणीत विजय मिळवावा; टीम इंडियाची वर्ल्डकप जिंकण्याचे समीकरण…

कंपन्यांनी त्यांच्या अनुभवानुसार या ट्रायलवर १० पैकी ८.५ गुण दिले. या काळातील व्यवसाइक कामगिरीसाठी १० पैकी ७.५ इतके गुण दिले. महसूलाबाबत देखील हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. ज्या कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या त्यांच्या महसूलात गेल्या वर्षाच्या तुलनेत ३५ टक्के वाढ झाली आहे. यात बँकिंग, मार्केटिंग, रिटेल आणि फायनान्ससह अनेक सेक्टरमधील कंपन्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे या काळात कर्मचाऱ्यांना आरोग्य विषयी कोणत्याही अडचणी आल्या नाहीत. चार दिवस काम केल्यामुळे कंपन्यांच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचे देखील म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here