कॅनबेरा: आपण सारेच कधी ना कधी हॉटेलात जेवायला जातो. तेव्हा बिल देत असताना आपण त्या वेटरला काही पैसे टीप म्हणून देतो. ही टीप किती असते तर ५० रुपये किंवा जास्तीत जास्त ५०० रुपये. पण, एका महिला वेटरला इतकी टीप मिळाली की तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. या तरुणीने कधी स्वप्नानही विचार केला नसेल इतकी मोठी टीप तिला मिळाली.

ही घटना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरातील असल्याची माहिती आहे. येथे, एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या लॉरेन या मुलीसोबत एक स्वप्नवत घटना घडली आहे. तिने तिच्या रेस्टॉरंटमध्ये आलेल्या एका ग्राहकाला आणि त्याच्यासोबत आलेल्यांना सर्व्ह केलं. त्यानंतर जेव्हा बिल आले. तेव्हा त्या ग्राहकाने ४२ हजार रुपयांच्या बिलवर तब्बल ८ लाख रुपयांची टीप दिली. तिला कधी एवढी मोठी टीप मिळेल अशी तिने स्वप्नातही अपेक्षा केली नसेल.

स्वत:च्याच शेतात अखेरचा श्वास; उडीद पिकाची मळणी सुरु असताना साडी अडकली अन्…
लॉरेन ही विद्यापीठात शिक्षण घेत आहे. तिने एका रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस म्हणूनही काम करते. ती ४ जणांच्या टेबलवर जेवण देत होती. जेवण झाल्यावर तिने ग्राहकाला ४२ हजार रुपयांचे बिल दिले. तर ग्राहकाने तिला त्यात आणखी ८ लाख रुपये जोडण्यास सांगितले. हे ऐकताच लॉरेनला कळेना काय करावं, तिने तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या सहकारी वेट्रेसला विचारलं की काय करावं. यादरम्यान लॉरेन खूप भावूक झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिने मॅनेजरला विचारल्यावर ही टीप घेतली.

नशेच्या अग्नीत प्रेम स्वाहा; पतीला सोडून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेला प्रियकरानेच संपवलं
इतकी मोठी टीप मिळाल्याने लॉरेन खूप खूश आहे. यातील अडीच लाख रुपये तिने आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसोबत शेअर केले आहेत. तर उर्वरित ५ लाख ५० हजार रुपयातून ती परदेशात सुट्टी घालवण्याचा विचार करत आहे. इतकंच नाही तर तिने या टीपचं बिलही आपल्याकडे जपून ठेवले आहे कारण तिच्यासाठी ते खूप खास आहे. ज्या लोकांनी त्याला ही टीप दिली ते क्रिप्टो व्यावसायिक होते. त्यांच्याकडे सुमारे १० अब्ज रुपयांची संपत्ती असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here