डोंबिवली: कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे स्थानकांमध्ये यापूर्वी १२ डबा, १५ डबा लोकलचे थांबे स्वतंत्र होते. त्यामुळे प्रवासी लोकल किती डब्याची आहे हे पाहून त्याप्रमाणे डब्यात चढण्याचा निर्णय घेत होते. आता १५ डबा लोकल ज्या थांब्यावर स्थानकात फलाटावर थांबत होती. त्या थांब्यावर १२ डब्याची लोकल सोमवार पासून थांबू लागली आहे. आता स्थानकात तीन डबे पुढे जाऊन १२ डब्याची लोकल थांबू लागल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. विशेष करुन महिला आणि प्रथम श्रेणीत चढणाऱ्या प्रवाशांना डबे पुढे गेल्याने धावत पळत जाऊन लोकल पकडावी लागत आहे.

कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चार, पाच, सहा, सात, डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चार, पाचवर प्रवाशांचा गोंधळ उडत आहे. फेरबदलामुळे महिला प्रवाशांचे, प्रथम श्रेणीच्या डब्यांच्या स्थानकात उभे राहण्याच्या रचनेत बदल झाले आहेत. प्रवाशांना आता नवीन जागेत उभे राहून डबा पकडावा लागतो. १५ डबे लोकल यापूर्वी ज्या ठिकाणी उभी राहत होती. तेथे स्थानकांवर अनेक ठिकाणी निवारा नाही. प्रवाशांना उन्हात उभे राहून लोकल पकडावी लागते किंवा अगोदर सावलीचा आधार घ्यावा लागतो.

बिल हजारांचं टीप लाखांची; एका क्षणात महिला वेटरचं नशिब बदललं; आता प्लान करतेय…
लोकल स्थानकात येत असताना उन्हात जाऊन लोकल पकडावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वी स्थानकातील ज्या भागात निवारे नाहीत तेथे रेल्वे प्रशासनाने निवारे टाकण्याची कामे पूर्ण करावीत. अन्यथा पावसाळ्यात लोकल पकडताना गोंधळ उडेल, असे प्रवाशांनी सांगितले.

याबाबत तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष लता अरगडे यांनी सांगितले की बारा डब्यांच्या लोकलच्या थांब्यात रेल्वे प्रशासनाने बदल केला आहे. हा बदल कशासाठी करण्यात आला आहे, यातून काय साध्य होणार माहित नाही. या बदलामुळे महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक यांची धावपळ होत आहे. याच बारा डब्यांच्या लोकलला तीन नविन डब्यांची जोड करत सर्वच लोकल या पंधरा डब्यांचा करण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा.
नशेच्या अग्नीत प्रेम स्वाहा; पतीला सोडून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेला प्रियकरानेच संपवलं

यामध्ये महिलांसाठी वाढीव डब्बे असावे. महिला दिन जवळ येत असून महिला प्रवाशांना ही भेट देण्यास हरकत नाही. लोकलच्या डब्यात, वेळापत्रकात बदल करण्याऐवजी रेल्वे स्थानकांतील समस्या दूर करण्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे असे वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here