नवी दिल्लीः कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी गुरुवारी दिल्लीतील . बंगला रिकामा केल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्यासमोर सर्वकाही तपासण्यासाठी पाठवले. नंतर कुठलीही गडबड होऊ नये, म्हणून पाहा सर्व काही बसवलेलं बंगल्यातच सोडून जात आहे, असं प्रियांका गांधी यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. बंगला रिकामा केल्यानंतर तो दाखवताना प्रियांका गांधीचा व्हिडिओही समोर आला आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सरकारी बंगला सोडल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. हा वाद डोळ्यासमोर डोळ्यासमोर प्रियंका गांधी यांनी सर्व काळजी घेतल्याचं सांगितलं जातंय.

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना लखनऊमधी सरकारी बंगला रिकामा करावा लागला. बंगला रिकामा करताना त्यांनी तोडफोड केली आणि नळाची तोटीही काढून नेली, असे आरोप झाले होते. यावर अखिलेश यादव यांनीही बरेच स्पष्टीकरण दिले. अखिलेशच्या यांच्यावर विरोधकांनी ‘टोंटीचोर’ अशी टीकाही केली होती.

मी गेल्यानंतर काहीच गडबड व्हायला नकोः प्रियांका गांधी

अधिकाऱ्यांच्या सोबत प्रियांका गांधींचा गुरुवारी लोधी इस्टेट या बंगल्यात आल्या. यावेळचा व्हिडिओ समोर आला आहे. ‘आपण बंगल्यात जे काही बसवले आहे ते सर्व इथेच सोडत आहे. हे इथेच स्पष्ट करून सांगते. हे सगळं तुम्ही पाहून घ्या. मी गेल्यानंतर काहीही गडबड नको आहे’, असं प्रियांका गांधींनी अधिकाऱ्यांना स्पष्ट केलं. एसपीजी सुरक्षा काढून घेतल्यानंतर प्रियांका गांधी यांना बंगला रिकामा करावा लागला आहे.

प्रियंका गांधी वड्रा यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील लोधी इस्टेट भागातील सरकारी बंगला गुरुवारी रिकामा केला. प्रियांका गांधी या आता गुरुग्राममध्ये काही दिवस राहणार आहेत. त्यानंतर मध्य दिल्ली भागातील निवासस्थानात त्या शिफ्ट होणार आहेत. प्रियांका गांधी यांनी आपल्या मध्य दिल्लीतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या घराचं रंगकाम आणि दुरुस्ती सुरू आहे, अशी माहिती प्रियांका गांधींशी संबंधित सूत्रांनी दिली.

सोनिया गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्या नियमित तपासणीसाठी आल्या होत्या, अशी माहिती हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. डी. एस. राणा यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here