अंकुशचा मित्र मनोज अळसपुरे याला अंकुश राऊतने अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या मंगला देशमुख हिच्याकडून १ लाख ६० हजार रुपये व्याजाने काढून दिले होते, मात्र मनोज अळसपुरे हा पैसा भरत नसल्यामुळे मंगला देशमुख ही अंकुशकडे पैशांसाठी तगादा लावत होती. अंकुश त्या पैशांचे व्याज भरायचा. त्यानंतरही मंगला देशमुखही दवाखान्यामध्ये जाऊन त्याला शिवीगाळ करायची. यामुळे तो तणावात वावरत होता. या चौघांमुळे अंकुशने आत्महत्या केल्याचे त्याचे वडील नंदकिशोर राऊत यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, मोठी उमरीतील अवैध सावकारी व्यवसाय करणारी मंगला देशमुख, मनोज अळसपुरे, अंकुशच्या घराचा बांधकामाचे ३ लाख रुपयांमध्ये कंत्राट घेऊनही बांधकाम न करणारे विजय व अजय मालोकार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. अंकुशनेही आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या चौघांच्या नावांचा उल्लेख केला होता. आत सिव्हिल लाइन पोलिसांनी चौघांविरुद्ध आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
काय होतं अंकुशने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये?
सुसाईट नोटमध्ये नमूद आहे की घर बांधकामसाठी बँकेतून कर्ज काढलं, अन् घर बांधकामाचा कंत्राट हा विजय व अजय मालोकार या व्यक्तींना दिला. त्यांना ३ लाख रूपये दिले. त्यांनी जुने घर पाडले, पण नवीन बांधकाम सुरू केलं नाही. वेळोवेळी बांधकाम सुरू करण्याबाबत म्हणत गेलो, पण अजु दादाने टाळाटाळ केली. बांधकामासाठी दिलेला पैसा परत मागितला. तरीही ठेकेदाराने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. इतकंच नव्हे तर पैसे देत नाही, माझे नातेवाईक राजकारणात तसेच पोलिसातही आहेत, काय करायचं करून घे, अशी धमकी देत गेला. अजय दादा, विजय दादा माझ्या घरात खायची सोय नाही… घरात गहू नाही, आम्ही रस्त्यावर आलो. दादा तुम्ही जान ठेवायला पाहिजे, घर बांधकामासाठी दिलेला पैसा परत करा, अशी वेळोवेळी मागणी केली. इतके असताना नवीन घर उभं करण्यासाठी आणखी इतर लोकांकडून कर्ज घेतले आणि त्याचा कंत्राट दुसऱ्याला देत बांधकाम सुरू केलं, असा उल्लेख अंकुशने सुसाईड नोटमध्ये केला होता.
अंकुशने पुढं चिठ्ठीत म्हटलं होतं, की माझा मित्र ‘मनोज’ याच्यासाठी उमरीतील मंगला देशमुखकडून १ लाख ६० हजार रुपयांचं कर्ज घेतले. मनोजने कर्जाची परतफेड करण्यास नकार दिला. त्यामुळे सावकारी महिलेने माझ्यामागे तगादा लावला. अन् मी त्या कर्जाचे हप्ते भरत गेलो. कधी अवैध सावकारी महिलेला व्याजावर घेतलेल्या रक्कमेचा हप्ता वेळेवर न दिला जायचा. त्यानंतर सावकारी महिला सतत घरी येऊन तसेच जिथे तो काम करायचो तिथे येऊन अश्लील शिवीगाळ करायची, तसेच मानसिक त्रास द्यायची. दरम्यान काही लोकांनी माझ्याकडून कोरे धनादेश अन् बॉण्ड पेपर लिहून घेतले आहेत. पण ते कोणी लिहून घेतले. यासंदर्भात चिठ्ठीमध्ये नमूद नव्हतं. तसेच आता तरी माझ्या आई-वडिलांना त्रास देऊ नका अजय दादा, विजय दादा. दिलेला पैसा परत करा, अशी विनंती केली आहे.
काही रुपयांच्या कर्जापोटी लाखो रुपयांची मागणी
अवैध सावकाराकडून एकाने घेतलेल्या कर्जाचा अंकुश मध्यस्थी ठरला होता. मात्र त्याचा मित्र वेळेत कर्जफेड न करू शकल्यामुळे सावकारी महिलेने अंकुशमागे तगादा लावला होता. काही रुपयांच्या कर्जापोटी लाखो रुपयांची मागणी त्याच्याकडे करण्यात आली होती. या त्रासाला कंटाळून अंकुशने आत्महत्या केली आहे.
अजित दादा रॅलीसाठी ओपन जीपवर चढले, पण आदित्यसाठी २० मिनिटं ताटकळले, अखेर वैतागले