अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप आतापर्यंतचे विक्रम मोडत सातव्यांदा सत्ता मिळवली. आता भाजपसमोर नवीन अडचण निर्माण होत आहे. कारण, मोठ्या संख्येनं निवडून आलेल्या आमदारांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळं भाजपसमोर अडचणी निर्माण होत आहेत. भाजप हा शिस्तप्रिय पक्ष मानला जातो पण आमदारांकडून वेगवेगळ्या मुद्यांवर आक्रमक भूमिका घेत पक्षापुढं अडचणी नि्रमाण केल्या जात असल्याचं चित्र आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आमदारांनी दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातील वारछा येथील आमदार आणि माजी मंत्री किशोर कनाणी, सावली मतदारसंघातील आमदार केतन इमानदार पक्षासमोर आव्हान उभं केलं होतं. काँग्रेसमध्ये कार्याध्यक्ष पदावर काम करणाऱ्या हार्दिक पटेल यांनी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. हार्दिक पटेल भाजपमध्ये आल्यानंतर वीरमगाम येथून विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. हार्दिक पटेल यांनी एक पत्र पाठवून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

गुजरातमध्ये सध्या भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्त्वातील सरकार सत्तेत असून प्रदेश भाजपची जबाबदारी सी. आर. पाटील यांच्याकडे आहे. हार्दिक पटेल यांनी कापसाचा समावेश किमान आधारभूत किमतीमध्ये करावा, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळ पडल्यास आंदोलन देखील करण्यात येईल, असा इशारा हार्दिक पटेल यांनी कृषी मंत्री राघवजी पटेल यांना दिला आहे. देशी कापसाची किमान आधारभूत किंमत निश्चित नाही. देशी कापसाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचं व्यापाऱ्याकंडून शोषण केलं जातंय, असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं. हार्दिक पटेल यांंनी शेतकऱ्यांच्या हितासाठी महात्मा गांधी यांच्या मार्गानं अहिंसक संघर्ष सुरु करणार असल्याचं म्हटलं.

भाजपला कमी मतदान झाल्यास उमेदवारीबद्दल विचार केला जाईल; फडणवीसांची नगरसेवकांना तंबी

केतन इनामदार आणि किशोर कनाणी यांचा लेटरबॉम्ब


भाजपच्या तिकीटावर विजयी होऊन देखील वारछा मतदारसंघातून विजयी झालेल्या किशोर कनाणी यांनी अनेक मुद्यांवर सरकारपुढं अडचणी निर्माण केल्या आहेत. काही मुद्यांवर त्यांनी सरकारवर लेटरबॉम्ब टाकला आहे. सूरतमधील लक्झरी बसेसच्या प्रवेशाच्या मुद्यावरुन त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बडोदा डेअरीमध्ये दूध उत्पादकांवर होणाऱ्या अन्यायावर देखील त्यांनी आवाज उठवला आहे.

आई-बाबा-शुभांगी माफ करा; शेवटचे शब्द लिहून आयुष्य संपवलं, महिलेसह चौघांवर गुन्हा

दुसरीकडे केतन इनामदार यांनी देखील सोमवारी धरणे आंदोलन केलं होतं. हे सर्व आमदार ज्या पक्षाचे आहेत त्यांचं सरकार असताना त्यांना आंदोलन करण्याची वेळ का येत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. १५६ जागांवर विजय मिळवत सत्तेत परतणाऱ्या भाजपला विरोधी पक्षांच्या आमदारांपेक्षा स्वपक्षाच्या आमदारांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या मुद्यांना तोंड द्यावं लागतंय.

Navi Mumbai: तुर्भे परिसरात अमोनिया वायूची गळती, गटारातून गॅस थेट वस्तीत शिरला; नागरिकांना श्वास घेण्यास त्रास

आधी तांबेना ऑफर, आता काँग्रेसच्या नेत्याकडून फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात हिसाब बराबर!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here