मुंबई : देशांतर्गत बाजाराची आजची वाटचाल खूपच सुस्त दिसत असून अमेरिकन बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय मार्केटवरही दिसून येत आहे. कमकुवत जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराची आजची सुरुवात घसरणीसह झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकन बाजारातील काल रात्रीच्या जोरदार घसरणीचा परिणाम देशांतर्गत बाजारांवरही होत असून सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात देखील कमजोरी दिसून आली. यूएस मार्केटबद्दल बोलायचे झाले तर काल बाजार २०२३ च्या नीचांकी पातळीवर क्लोज झाला.

दिलासादायक! ‘अदानी’ शेअर देतोय वेगवान परतावा, तिसऱ्या दिवशी तेजी, वाचा कमाईदार स्टॉकची स्थिती
बाजाराची ओपनिंग
बुधवारी बाजाराच्या सुरुवातीला मुंबई शेअर बाजार म्हणजे बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स जवळपास ३०० अंकांनी घसरला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ५० शेअर्सचा एनएसई निफ्टी १७,८०० अंकांच्या खाली पडला. दुसरीकडे, बाजाराच्या प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण होताना दिसली. निफ्टी ७०.९५ अंक म्हणजेच ०.४०% घसरणीसह १७७५५.७५ च्या पातळीवर तर बीएसईचा सेन्सेक्स २६८.६५ अंकांच्या म्हणजेच ०.४४% घसरणीसह ६०४०४.०७ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

सेन्सेक्स-निफ्टीचे शेअर्स
सेन्सेक्सच्या ३० समभागांपैकी फक्त ३ मध्ये तेजी दिसत असताना यामध्ये सन फार्मा, एल अँड टी आणि एचयूएल यांचा समावेश आहे. तर निफ्टीच्या ५० पैकी फक्त १० समभागांत वाढ होत असून ४० समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत.

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला मोठा नफा, मार्केट कॅप इतक्या हजार कोटींनी वाढली
कोणते शेअर्स वाढले, कोणते पडले
सेन्सेक्समधील नेस्ले, ॲक्सिस बँक, आयटीसी, एमअँडएम, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, भारती एअरटेल, एनटीपीसी, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, टायटन, टीसीएस आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण झाली आहे.

याउलट निफ्टीच्या टाटा कंझ्युमर्स, बजाज ऑटो, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, कोल इंडिया, L&T, DV’s सन फार्मा, अपोलो हॉस्पिटल्स, हिंदाल्को, डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज, एचयूएल, हिरो मोटोकॉर्प या स्टॉक्समध्ये वाढ दिसून येत आहे. अशाप्रकारे आज फार्मा आणि हेल्थकेअर वगळता इतर सर्व निर्देशांकात घसरण होत आहे. सर्वात मोठी घसरण तेल आणि वायूच्या शेअर्समध्ये सुमारे १ टक्के घट झाली आहे. तर मीडिया आणि मेटल स्टॉक्समध्ये ०.८९-०.८३ टक्क्यांची घसरण नोंदवली जात आहे.

शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? कधी, कशामुळे लागतं, समजून घ्या
‘अदानी’ शेअर्सवर आजही विक्रीचा दबाव

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आज संमिश्र व्यवहार होताना दिसत आहे. आजही अदानी समूहाचे काही शेअर्स तेजीत आहेत तर काहींमध्ये घसरण कायम आहेत. सकाळच्या सत्रात अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन, अदानी गॅस, अदानी विल्मर अदानी पोर्टवर विक्रीचा दबाव दिसत असताना अंबुजा सिमेंट, एसीसी, एनडीटीव्हीही लाल रंगात व्यवहार करत होते. अदानी पॉवरचा शेअर्स हिरव्या रंगात दिसला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here