मुंबई: प्रसिद्ध गायक यांनी अयोध्येत महाबुद्धविहार बांधण्याची मागणी केलेली असतानाच रिपब्लिकन नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी अयोध्येत बुद्ध विहार उभारणार असल्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटून सरकारकडून बुद्ध विहारासाठी जागा मिळवणार असल्याचं रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.

भारत बौद्धमय असताना अयोध्येचे नाव साकेत नगरी होते. अयोध्येत बाबरी मशीद उभारण्या आधी राम मंदिर होते आणि त्यापूर्वी बुद्ध विहार होते. मात्र अयोध्येतील मंदिर-मशिदीचा वाद कायमचा मिटला आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानानुसार न्यायालयाने निकाल दिला असून त्या निर्णयाचे आम्ही स्वागत केले आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिर होणार आहे तसेच मशिदीला ही जागा देण्यात आली असून वादग्रस्त जागा सोडून अयोध्येत अन्यत्र जमीन घेऊन तेथे भव्य बुद्ध विहार उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन सरकारकडून बुद्ध विहारासाठी जागा मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच ट्रस्ट उभारून जागा मिळवून तेथे बुद्ध विहार उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. अयोध्येत बुद्ध विहार उभारावे, ही आपली गेल्या १० वर्षांपासूनची मागणी असल्याचंही रामदास आठवले यांनी सांगितलं.

अयोध्येत राम मंदिर, मशीद आणि बुद्ध विहार उभारून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधनातील सर्व धर्म समभावाचा संदेश जगाला द्यावा, असे आवाहनही त्यांनी केलं आहे. २ हजार ५०० वर्षांपूर्वी भारत संपूर्ण बौद्ध राष्ट्र होते. अयोध्येत वादग्रस्त जागी राम मंदिराचे तसेच बुद्ध विहाराचेही अवशेष सापडत आहेत हे सत्य आहे. बाबरी मशीद उभारण्याआधी तेथे राम मंदिर होते हे सत्य आहे. तसेच राम मंदिर उभारण्याआधी तेथे बुद्ध विहार होते हेही सत्य आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत केले असून वाद मिटला आहे. मात्र अयोध्येत बुद्ध विहारही उभारले पाहिजे, अशी आमची मागणी असून त्यासाठी देशभरातील बौद्ध जनतेचे सहकार्य घेऊन ट्रस्ट उभारून अयोध्येत भव्य बुद्ध विहार उभारण्याचा माझा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

आनंद शिंदे काय म्हणाले होते?

दरम्यान, आनंद शिंदे यांनीही अयोध्येत महाबुद्धविहार उभारण्याची मागणी केली होती. अयोध्येतील उत्खननात सापडलेल्या प्राचीन अवशेषावरून त्या ठिकाणी बाबरी मशिदीपूर्वी बुद्धाची साकेत नगरी असल्याचं सिद्ध होत आहे. या उत्खननात बुद्धाच्या मूर्त्या आणि बौद्ध परंपरेशी नाते सांगणारे अवशेष सापडले आहेत. ऑल इंडिया मिली कौन्सिलनेही त्या ठिकाणी साकेत नगरी असल्याचं मान्य केलं आहे. उत्खननामध्ये सापडलेल्या या प्राचीन अवशेषांचे जतन करण्यासाठी अयोध्येत मोठं संग्रहालय आणि महाबुद्ध विहार झालं पाहिजे. त्यासाठी सर्व बौद्ध नेत्यांनी गटतट विसरून एकत्र यावं. सर्व मतभेद विसरून या प्रश्नावर लढा उभारला पाहिजे, असं शिंदे म्हणाले होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here