विदर्भातील कापसाचे पंढरी समाजाला जाणाऱ्या अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत १६ फेब्रुवारीला कापसाचा भाव ८ हजार ३१५ पासून ८ हजार ८५० इतका होता. मात्र त्यानंतर कापसाच्या दरात सतत घसरण होत असल्याचे चित्र दिसून आले. १७ फेब्रुवारीला कापसाचे दर ८ हजार ७१० रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे असे होते, तर २० फेब्रुवारीला म्हणजे सोमवारी ८ हजार १०० ते ८ हजार ६०० रूपयांपर्यत प्रतिक्विंटरप्रमाणे असून या दिवशी कापसाचे आवकही चांगली झाली, तब्बल ४ हजार २०० क्विंटल इतका कापूस खरेदी झाला. काल २१ फेब्रुवारीला कापसाची आवक ४ हजार ५०० क्विंटल इतकी होती, तर कापसाला कमीत कमी भाव ८ हजार पासून ८ हजार ५२० रूपांप्रमाणे प्रतिक्विंटल अशी होती. गेल्या दोन ते तीन दिवसात कापसाच्या भावात तीनशे रुपयांनी घसरण झाले आहे. या तुलनेत अकोल्याच्या बाजार समितीमध्ये कापसाला भाव कमी आणि अतिशय कमी आवक झाली. या बाजारात ७ हजार ९०० पासून ८ हजार ४०० तर सरासरी भाव ८ हजार १०० रूपयांपर्यत कापासला मिळाला. इथेही कापसाच्या भावात शंभर रुपयांनी घसरण झाली आहे.
उद्धव ठाकरेंनी अद्याप तरी मुस्लिम धर्म स्वीकारला नाही; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले
तुरीच्या दरात चढ उतार
अकोटच्या बाजाराच्या तुलनेत अकोल्याच्या बाजार समितीत तुरीला चांगला भाव मिळतोय आणि आवकही चांगली आहे. कमीत कमी सहा हजार पासून जास्तीत जास्त भाव ८ हजार १९० रूपयांपर्यंत तर सरासरी भाव ७ हजार १०० रूपांपर्यंत प्रतिक्विंटरप्रमाणे होता. तुरीचे हे दर २० फेब्रुवारीच्या असून काल २१ फेब्रुवारीला तुरीच्या दरात ६ हजार ८०० ते ७ हजार ९६५ प्रतिक्विंटल प्रमाणे तुरीला भाव होता. त्यामुळ काल तुरीचे दर २६५ रुपयांनी घसरले असून आवक २ हजार ५०४ इतकी क्विंटल होती. तसेच अकोटच्या बाजारात तुरीला काल ७ हजार २१५ पासून जास्तीत जास्त भाव ८ हजार ३० रूपयांपर्यत होते. तर तुरीची आवक १ हजार २७५ इतकी क्विंटल होती. अकोल्याच्या बाजाराच्या तुलनेत काल तुरीच्या दरात अकोटच्या बाजारात ६५ रुपयांनी अधिक भाव होता.
पांढऱ्या हरभऱ्याला चांगला दर
अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पांढरा हरभऱ्याची आवक कमी असून १०८ इतका क्विंटल हरभरा खरेदी झाला. इथे पांढरा हरभऱ्याला ५ हजार तीनशे पासून जास्तीत जास्त ११ हजार ८३० रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळतो आहे. तर सरासरी भाव ९ हजार पाचशे रूपयांपर्यत आहे. तसेच रेगुलर हरभऱ्याला कमीत कमी ३ हजार ३६० ते ४ हजार ८२० रूपयांपर्यत भाव आहेत. तर आवकही चांगली असून ४ हजार ६०९ इतका क्विंटल हरभरा खरेदी झाला. या तुलनेत काल अकोटच्या बाजारात हरभऱ्याची आवक अन् भावही कमी होते, २ हजार ५७० इतकी क्विंटल हरभऱ्याची आवक झाली असून कमीत कमी ४ हजार ३८० पासून जास्तीत जास्त ४ हजार ७७५ रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल हरभऱ्याला भाव मिळाला.