मुंबई : मुंबईतील घाटकोपर परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहित महिलेने पती आणि सासूला मारहाण केल्याचा आरोप होत आहे. नवरा लग्नाचा वाढदिवस विसरल्यामुळे बायकोचा भडका उडाला. तिने माहेरी फोन करुन तिचा भाऊ आणि आई-वडिलांना बोलावून घेतलं. यावेळी झालेल्या भांडणानंतर तिने नवरा आणि सासूला मारहाण केली. आरोपी महिला आणि तिच्या पतीची १८ फेब्रुवारीला अॅनिव्हर्सरी होती. त्याच रात्री हा राडा झाला.

नवरा लग्नाचा वाढदिवस विसरल्याने महिलेचा पारा चांगलाच चढला. तिने आई वडील आणि भावाला सासरी बोलावून घेतलं. ते तिघं पोहोचताच सर्वांनी मिळून पीडित पती आणि त्याच्या आईला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही, तर तरुणाच्या कारचंही त्यांनी नुकसान केल्याचा दावा केला जात आहे.

प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी महिला, तिचा भाऊ आणि आई वडील अशा चौघा जणांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही त्यांना नोटीस दिली असून या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू, अशी माहिती घाटकोपर पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

३२ वर्षीय पीडित तरुण हा एका कुरिअर कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतो. तर त्याची पत्नी एका फूड आऊटलेटमध्ये नोकरीला आहे. दोघांचा विवाह २०१८ मध्ये झाला होता. ते गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात राहतात.

१८ फेब्रुवारीला त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस होता. मात्र पती तो विसरल्यामुळे पत्नी चिडली. यावेळी दोघांमध्ये खडाजंगी झाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी याच विषयावरुन वाद पुन्हा उफाळून आला. पती जेव्हा घराजवळ पार्क केलेली गाडी धुत होता, तेव्हाच पत्नी ऑफिसमधून आली. तिने नवऱ्याला आणि त्याच्या आईला यथेच्छ शिवीगाळ केली, आणि आपल्याला तुझ्यासोबत राहायचंच नसल्याचं सांगितलं, असा आरोप पीडित नवऱ्याने केला आहे.

बाईकच्या धडकेत बॅरिकेड अंगावर पडलं, जखमी पोलीस निरीक्षकाची मृत्यूशी झुंज अपयशी
तिने माहेरी फोन करुन तिघांना बोलावून घेतलं. घराखालीच सर्वांचा वाद झाला. त्यावेळी तिच्या भावाने तरुणाच्या गाडीचं नुकसान केलं. त्याच्या घराची खिडकी फोडली, असा आरोप आहे. यानंतर तरुणाची आई राहत असलेल्या घाटकोपर पश्चिमेकडील घरी सगळे जण गेले. या प्रश्नावर त्यांना तोडगा काढायचा होता. मात्र रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास वाद वाढला. महिलेने तिच्या सासूला चपराक लगावली. त्यानंतर माहेरच्या मंडळींनी दोघा मायलेकांना मारहाण केली. जखमी झालेल्या दोघांनी राजावाडी रुग्णालयात उपचार घेतले, त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली.
२३ वर्षीय तरुणाला हाव सुटली, हातावर पोट असलेल्या महिलेचा खून, सात दिवसात गूढ उकललं

पोलिसात दिलेल्या तक्रारीत तरुणाने पत्नीचा भाऊ आणि आई-वडिलांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पत्नीच्या भावाने आपल्या हातावर आणि चेहऱ्यावर चावल्याचा आरोप तरुणाने केल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले

मुलीची हौस; पोटच्या पोराला भावाला दिलं अन् भावाची लेक दत्तक; सख्ख्या भावांचा ऐतिहासिक निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here