नवी दिल्ली: महिला टी-२० विश्वचषक २०२३ आता अंतिम लढतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. लवकरच आता जगाला आपला टी-२० मधील महिलांचा चॅम्पियन संघ मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या या विश्वचषकातील लीग सतेजमधील सामने आता संपले आहेत आणि उपांत्य फेरीत संघांमध्ये निकराची लढत होणार आहे. महिला टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी चार संघ पात्र ठरले आहेत. ज्यात भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांचा समावेश आहे.

उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेल्या आफ्रिकेने बांगलादेशचा पराभव करून त्यांच्या गटात दुसरे स्थान मिळवले. आता या उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियाला दमदार फॉर्ममध्ये असणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा सामना करावा लागणार आहे. तर इंग्लंडचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
पृथ्वी शॉ प्रकरणावर सपना गिलचा गंभीर आरोप, म्हणाली- त्याने माझ्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला
कधी असणार उपांत्य फेरीतील सामने

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
महिला टी-२० विश्वचषक २०२३ मधील पहिला उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना २३ फेब्रुवारी २०२३ ला केपटाऊन, दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा आतापर्यंतचा प्रवास चांगला राहिला असून, त्यांनी त्यांचे सर्व सामने जिंकून गटात अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती, पण इंग्लंडसमोर संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर भारताने ६ गुणांसह गटात दुसरे स्थान पटकावले.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड

महिला टी-२० विश्वचषक २०२३ चा दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. एकीकडे इंग्लंडचा संघ आहे, ज्याने संपूर्ण विश्वचषकात आपली विजयाची घोडदौड कायम ठेवली, तर दुसरीकडे आफ्रिकन संघ आहे, ज्याने रोमहर्षक पद्धतीने सामना जिंकून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. हा सामना २४ फेब्रुवारी २०२३ ला दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे होणार आहे.

तुफानी खेळीनंतरही शतक हुकलं, स्मृती मानधनाची ८७ धावसंख्या ठरली ‘अनलकी’?
लाईव्ह सामना कुठे पाहता येणार

महिला टी-२० विश्वचषक २०२३ चे दोन्ही उपांत्य फेरीचे सामने स्टार स्पोर्ट्सच्या सर्व चॅनलवर टीव्हीवर पाहता येतील.

मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग कस पाहता येणार

मोबाईलमध्ये डिजनी प्लस हॉटस्टारवर महिला टी-२० विश्वचषकाचे उपांत्य फेरीची सामने लाईव्ह पाहता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here