नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठा बाजार एक्स्चेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (एनएसई) गुंतवणूकदारांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता राष्ट्रीय शेअर बाजाराने मार्केटमधील व्याजदर डेरिव्हेटिव्हसाठी ट्रेडिंगची वेळ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वाढवली आहे. जागतिक बातम्यांच्या प्रवाहामुळे दररोज उद्भवणारी जोखीम देशांतर्गत बाजारात व्यापाराचे तास वाढवून कमी केली जाऊ शकते. शेअर बाजार आणि आर्थिक तज्ज्ञांनीही या मुद्द्यावर सहमती दर्शवली आहे.

म्हणजे फेब्रुवारीच्या एक्सपायरी महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट्स एक्सपायरी डे म्हणजेच २३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ट्रेडिंगसाठी उपलब्ध असतील. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई) व्याजदर डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये ट्रेडिंगची वेळ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय उद्यापासून म्हणजेच २३ फेब्रुवारीपासून लागू होईल. तर सध्या देशांतर्गत शेअर बाजारात सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत व्यवहार होतात.

NSE कडून निफ्टी निर्देशांकात बदल; पेटीएमला मोठा झटका तर अदानींच्या दोन कंपन्यांना…
झिरोधाचे सह-संस्थापक नितीन कामत यांनी ट्विटर करत म्हटले की, फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटमध्ये व्यापाराचे तास वाढवणे हे आमच्या मार्केटची परिपक्वता दर्शवू शकते. हे देशांतर्गत व्यापार्‍यांसाठी समान खेळाचे क्षेत्र देखील प्रदान करेल आणि महसुलाच्या दृष्टीने भांडवली बाजार व्यवसायांसाठी देखील चांगले आहे.

NSE Phone Tapping: चित्रा रामकृष्णन यांना जामीन; ईडीने केली होती अटक
एनएसईच्या निर्णयाचा अर्थ काय?
हे समजून घेण्याआधी आधी डेरिव्हेटिव्ह्जबद्दल जाणून घ्या. हे एकप्रकारचे कॉन्ट्रैक्ट असते, ज्याची किंमत दिलेल्या विशिष्ट मालमत्तेवर अवलंबून असते. ही मालमत्ता काहीही असू शकते. उदाहरणार्थ स्टॉक, कमोडिटी, चलन, निर्देशांक इत्यादी. हे करार मर्यादित कालावधीसाठी वैध आहेत. सोप्या भाषेत बोलायचे तर ट्रेडिंग दरम्यान गुंतवणूकदार मर्यादित कालावधीसाठी करार करतात ज्या अंतर्गत त्यांना स्टॉक, कमोडिटी इत्यादींची खरेदी आणि विक्री करण्याची परवानगी असते. पण मुदत संपताच करार रद्द होतात. याला कॉन्ट्रॅक्ट एक्सपायरी असेही म्हणतात. अशा मार्केटमध्ये चार पर्याय – फॉरवर्ड, फ्युचर, ऑप्शन्स आणि स्वॅप्स- असतात.

राष्ट्रीय शेअर बाजाराने केलेला बदल प्रामुख्याने स्वॅप अंतर्गत प्रभावी असेल. स्वॅप करारामुळे एका सिक्युरिटीची दुसऱ्यासाठी देवाणघेवाण करता येते, ज्यामध्ये व्याजदर आणि चलन बदलाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here