मुंबई : हिंडेनबर्ग रिसर्चच्या एका अहवालाने भारतीय व्यवसाय क्षेत्र आणि शेअर बाजारात अक्षरशः भूकंप आला. या भूकंपात अब्जाधिश गौतम अदानी आणि त्यांच्या नेतृत्वातील अदानी समूह अजूनही स्वतःला सावरू शकलेला नाही. २४ जानेवारी रोजी अदानी ग्रुपबाबत हिंडेनबर्गने आपला अहवाल प्रकाशित केला आणि भारतीय उद्योगपतीच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत गेली. गौतम अदानींच्या अडचणी अजूनही कमी होण्याची चिन्हे दिसत नाही.

२२ फेब्रुवारी रोजीही गौतम अदानी यांच्या बहुतांश शेअर्सवर विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी अदानींकडून प्रयत्न सुरु आहेत, मात्र अपयशी ठरत आहेत. गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी अदानी पोर्ट्सने १५०० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली. तारण ठेवलेले शेअर्सही सोडण्यात आले, कर्जाच्या पूर्व पेमेंटबद्दल बोलले, पण याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही. हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाच्या समभागांनी एकत्रित मार्केट कॅपमध्ये $१३५ अब्जपेक्षा जास्त घट झाल्याचे दिसत आहे. यामुळे स्वतः गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्येही सातत्याने घसरण होत आहे.

बनावट खात्यांद्वारे अदानी कुटुंबाच्या माहितीशी छेडछाड प्रयत्न… वाचा कोणी केलाय असा आरोप
अदानींची संपत्ती स्वाहा
‘अदानी’ शेअर्सच्या घसरणीचा परिणाम गौतम अदानी यांच्या संपत्तीत बाजार उघडताच दिसून आला. काही तासांतच गौतम अदानी यांचे ५.५ अब्ज डॉलर म्हणजेच ४,५५,४६,३२,५०,००० रुपये स्वाहा झाले. गौतम अदानी आणि त्यांच्या गुंतवणूकदारांची डोकेदुखी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या २७ दिवसांत अदानींनी निम्म्याहून अधिक संपत्ती गमावली असून एकेकाळी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानींची संपत्ती ४४.१ अब्ज डॉलरवर इतकी राहिली आहे. यामुळे फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावरून २६ व्या क्रमांकावर फेकले गेले.

Adani-Hindenburg Row: अदानींप्रमाणे अडकले होते DLF अध्यक्ष, ब्लॅकमेलरला दिलेले सडेतोड उत्तर
रोख बचत आणि कर्ज फेडण्यावर लक्ष
हिंडेनबर्गचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी गौतम अदानी आता वेगळ्या योजनांवर काम करत आहे. समूहाने आपले संपूर्ण लक्ष कर्ज फेडण्याकडे आणि रोख बचत करण्यावर केंद्रित केले आहे. यासोबतच विस्तार योजनांनाही ब्रेक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि याचे ताजे उदाहरण म्हणजे डीबी पॉवर आणि पीटीसी इंडिया डीलमधून माघार घेणे.
गुंतवणूकदारांनी पाठ फिरवताच अदानींची धावाधाव… SBI म्युच्युअल फंडाचे हजार कोटींचे कर्ज फेडले
‘अदानी’ शेअर्सची स्थिती
बुधवारच्या सुरुवातीच्या काही सत्रात देखील ‘अदानी’ शेअर्सची घसरण सुरूच आहे. बाजार उघडताच अदानी एंटरप्रायझेसचा स्टॉक ५% पर्यंत घसरलेला असून अदानींच्या सर्व १० सूचिबद्ध कंपन्यांचे शेअर्स कोसळले. अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मार शेअर्समध्ये ५-५ टक्क्यांपर्यंत घसरण होत असताना एनडीटीव्हीचे शेअर्स ४%, एसीसी सिमेंट १.५ टक्क्यांनी तर अंबुजा सिमेंटचे भाव २ टक्क्यांनी घसरला. याशिवाय अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्येही २ टक्क्यांनी घसरण झाली असून कंपनीचे बाजार भांडवल $१०० अब्ज पेक्षा जास्त घसरून ८,२०,९१५ कोटी रुपये इतके राहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here