१९ फेब्रुवारी निकाह झाला. त्यानंतर २१ फेब्रुवारीला रिसेप्शन पार्टी होती. कुटुंबीय, नातेवाईक त्यासाठी तयारी करत होते. घरात आनंदाचं वातावरण होतं. नवरा, नवरी त्यांच्या खोलीत तयारीसाठी गेले. त्याचवेळी दोघांमध्ये वाद झाला. नवरदेवानं धारदार शस्त्रानं नवरीवर वार केले. नवरदेव वार करत असताना नवरीनं मदतीसाठी आरडाओरडा केला. तिचा आवाज नवरदेवाच्या आईनं धाव घेतली. मात्र दार आतून बंद होतं.
रायपूर पोलीस घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी दार उघडून खोलीत प्रवेश केला, त्यावेळी त्यांना खोलीत अनेक ठिकाणी रक्ताचे डाग दिसले. नवरीचा मृतदेह बेडवर, तर नवरदेवाचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेमागचं कारण अद्याप तरी पोलिसांना शोधता आलेलं नाही.
टिकरापारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरा आणि नवरी रायपूरचे रहिवासी होते. अस्लम अहमद आणि कहकशा बानो अशी दोघांची नावं आहेत. १९ फेब्रुवारीला त्यांचा निकाह झाला. दोन दिवसांनी म्हणजेच २१ फेब्रुवारीला रिसेप्शन पार्टी होती. त्यासाठी दोघे त्यांच्या खोलीत तयार होण्यासाठी गेले. दरवाजा आतून बंद होता.
काही वेळातच खोलीतून नवविवाहितेचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. सुनेचा आवाज ऐकून सासू खोलीजवळ गेल्या. त्यांनी दार ठोठावलं. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. दार आतून बंद होतं. सासूबाईंनी याची माहिती कुटुंबातील इतर सदस्यांना दिली. त्यांनी खिडकीचे पदडे खेचले, लोखंडी गज तोडले, त्यावेळी त्यांना आत दोघांचे मृतदेह दिसले.