अमरावती : शहरातील एका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थिनींची छेड काढल्याचा प्रकार मंगळवारी घडला. यानंतर विद्यार्थिनीच्या बचावासाठी पुढे आलेल्या तरुणांचा छेड काढणाऱ्या तरुणांसोबत वाद होऊन मारहाणीचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयींनावर कारवाई केली. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता.

आयटीआयच्या दोन विद्यार्थिनी जेवणानंतर परिसरात फेरफटका मारत होत्या. यावेळी तीन युवक दुचाकीवरून तेथे आले. दुचाकीचा धक्का एका युवतीला लागल्याने तिने हटकले. यानंतर युवकाने युवतीसोबत वाद घातला. त्यांच्या बचावासाठी आयटीआयचे दोन युवक तेथे पोहोचले. यावेळी दोघांमध्ये हाणामारी झाली. यात छेडखानी करणारा एक तर बचाव करणारे दोन युवक जखमी झाले. घटनेनंतर युवतीने गाडगेनगर पोलीस ठाण्यात तीन युवकांविरोधात तक्रार दिली.

आवाज दिला तरी आई उठेना, १२ वर्षीय मुलाने बहिणीला बोलावलं अन् बापाच्या कृत्याचा भांडाफोड झाला!

ITI परिसरात नेमकं काय घडलं?

शासकीय आयटीआयमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनी परिसरात पायी जात होत्या. यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी त्यांना कट मारला. त्यामुळे विद्यार्थिनींनी त्या तरुणांना जाब विचारला. त्यावर दोघांपैकी एकाने विद्यार्थिनीला मारहाण करण्यात आली. हा प्रकार लक्षात आल्यावर इतर दोन मैत्रिणी व दोन मित्र त्या ठिकाणी आले. तसेच दुचाकीस्वार तरुणाचा एक साथीदारही तेथे आला. यावेळी विद्यार्थिनी, त्यांचे दोन मित्र तसेच दुचाकीस्वार दोन तरुण व त्यांचा आणखी एक साथीदार यांच्यात हाणामारी झाली.

या हाणामारीत दोन्हीकडील तीन जण जखमी झाले. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विक्रम साळी, साहाय्यक आयुक्त पूनम पाटील, ठाणेदार आसाराम चोरमले, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे आयटीआयमध्ये दाखल झाले. विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी दुचाकीस्वारांपैकी एकाला ताब्यात घेतलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here