Agriculture News : शेतकरी (Farmers) आपल्या शेतात सातत्यानं नवनवीन प्रयोग करत आहे. या माध्यातून चांगल उत्पन्न घेत आहेत. असाच एक वेगळा प्रयोग अकोला (Akola) जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी केला आहे. हा प्रयोग आहे ‘चिया’ शेतीचा (chia Crop). बार्शी टाकळी तालुक्यातील मोरळ, भेंडी गाजी, बैरखेड पिंजर येथील शेतकऱ्यांनी ही शेती केली आहे. चार शेतकरी मित्रांनी युट्युबवरून ( (YouTube) धडे घेत एकमेकांच्या सहकार्यानं ही ‘चिया’ शेती केली आहे. चिया या पिकाचा विविध पेयांमध्ये वापर केला जातो. तसेच वजन कमी करण्यासाठी आहार तज्ज्ञांकडून देखील या बियांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. 

रब्बी हंगामासाठी चिया सक्षम पर्याय

अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी एका पिकाचा सक्षम पर्याय मिळाला आहे. हा पर्याय आहे चिया शेतीचा. अमेरिकेतील मेक्सिको प्रांतात प्रामुख्यानं या पिकाची शेती केली जाते. चिया या पिकाच्या बिया वापरल्या विविध पेयांमध्ये वापरल्या जातात. याच शेतीची पायवाट ‘युट्यूब’वरून काही तरुणांना गवसली. बार्शी टाकळी तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील चार शेतकरी मित्रांनी एकत्र येत ही नवी शेती केली आहे. यावर्षी पहिलंच वर्ष असल्यानं चौघांनीही प्रत्येकी दोन एकरांवर हा प्रयोग केला आहे. ओमप्रकाश वानखडे ( पिंजर, जि. अकोला),  गजानन मार्गे (मोरळ) अशी शेतकऱ्यांची नावे आहेत. 

चिया शेतीचे फायदे काय? 

किडीचा प्रादुर्भाव होत नसल्याने फवारणीचा खर्च नाही. 
लागवड आणि संगोपनाचा एकरी खर्च अतिशय कमी 
जंगली प्राणी हे पीक खात नसल्यानं जंगली प्राण्यांच्या त्रासापासून शेतकऱ्यांची मुक्तता 
खर्च कमी, उत्पादन जास्त आणि त्यामुळं नफा जास्त असं या शेतीचं सुत्रं आहे

चियासह इतर पिकांचीही लागवड 

या चारही शेतकऱ्यांनी चिया शेती होत असलेल्या मध्य प्रदेशातील निमच येथे भेट दिली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये चौघांनीही या पिकाची लागवड केली आहे. चार महिन्याचं हे पिक आता काढणीच्या अवस्थेत आले आहे. या चारही शेतकऱ्यांनी या पिकासोबतच इतरही पिकं घेतली आहेत. गजानन मार्गेंनी आपल्या शेतात चियासह खरबूज, मिरची, कापूस, गहू, हरभरा, तीळ अशा पिकांची लागवड केली आहे. 

चिया पिकाला मध्य प्रदेशातील निमच, राजस्थान आणि नवी दिल्ली या मोठ्या बाजारपेठा आहेत. चिया शेती ही अतिशय किफायतशीर आहे. या पिकाला एकरी लागवड आणि संगोपनाचा खर्च हा पाच हजारांपर्यंत आहे. एकरी पाच ते सात क्विंटलचं उत्पन्न यातून मिळते. क्विंटलमागे 15 ते 20 हजार रुपये भाव लक्षात घेता यातून एकरामागे किमान एक लाख रुपयापर्यंत नफा अपेक्षीत आहे. 

चिया शेतीचं अर्थशास्त्र

एकरी लागवडीसाठी लागणारा खर्च : 5 हजार रुपये
संभाव्य सरासरी एकरी उत्पन्न : 5 ते 7 क्विंटल
संभाव्य सरासरी बाजारभाव : 15 ते 20 हजार रुपये प्रती क्विंटल
खर्च वजा जाता निव्वळ नफा : 75 हजार ते 1 लाख प्रति एकर

पारंपारिक शेती आणि पीक पद्धतींच्या मळलेल्या वाटा सोडत नव्या पायवाटा शोधणे गरजेचं आहे. चिया शेती याच नव्या पायवाटेवरील शेतकरी उत्कर्षाचा नवा राजमार्ग ठरू शकतो. 

महत्त्वाचे बातम्या:

Agri Innovation: आधुनिक तंत्रज्ञानाला सरकारी मदतीची जोड, वर्षाकाठी शेतकरी करतोय 10 लाखांची कमाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here