morning walk women dies, मॉर्निंग वॉक करताना गाडीने उडवलं, दोघींचा मृत्यू, बारामती-इंदापूर पालखी महामार्गावर अपघात – maharashtra accident news today pune baramati indapur palkhi highway car hits two women during morning walk friends died on the spot
इंदापूर : मार्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अज्ञात वाहनांनी धडक देऊन चिरडल्यामुळे दोघी जणींना प्राण गमवावे लागले. ही घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर बारामती-इंदापूर पालखी महामार्गावर घडली. या अपघातामध्ये अर्चना श्रीशैल सनमठ व अनिता शिवाजी शिंदे (रा. दोघी, आनंदनगर) यांचा मृत्यू झाला.
जंक्शन येथील आनंदनगर भागात राहणारे अनेक नागरिक मार्निंग वॉकसाठी बारामती-इंदापूर व जंक्शन-वालचंदनगर रस्त्याने फिरत असतात. सध्या बारामती ते इंदापूर दरम्यानच्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. जंक्शन चौकामध्ये हे काम सुरु असून काम करणारी अवजड वाहनेही भरधाव वेगाने रस्त्याने ये-जा करीत आहेत. आज बुधवार (ता. २२ फेब्रुवारी) रोजी नेहमी प्रमाणे सकाळी सात वाजताच्या सुमारास अर्चना सनमठ व अनिता शिंदे (रा. दोघी, आनंदनगर) पोलिस ठाण्याजवळून बारामती-इंदापूर राज्य मार्गाच्या सर्व्हिस रोडने मार्निंग वॉक करीत असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात अवजड वाहनाने पाठीमागून धडक दिली. आई-बाबा-शुभांगी माफ करा; शेवटचे शब्द लिहून आयुष्य संपवलं, महिलेसह चौघांवर गुन्हा या अपघातात अर्चना सनमठ यांचा जागीच मृत्यू झाला तर अनिता शिंदे जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर दवाखान्यामध्ये उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.