रायगड : मुंबई-पुणे जुन्या द्रुतगती मार्गावर खोपोली शहरात भीषण अपघात झाला आहे. दुचाकीस्वार तरुण रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या पोलला धडकला. या अपघातात ३७ वर्षीय भूषण आयगल याचा जागीच मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, खोपोली शहरात बापदेव मंदिराजवळ हा भीषण अपघात झाला आहे. भूषण बीपीन आयगल हा आपल्या दुचाकीवरून खोपोली शिळफाट्यावरून खोपोलीकडे जात होता. मात्र बापदेव मंदिराजवळ आल्यानंतर भूषणची दुचाकी विजेच्या पोलवर आदळली. या अपघातात भूषणच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो रक्तबंबाळ झाला.

नवऱ्याला संपवलं, तुकडे केले, त्याच घरात पूजा घातली; ६ महिने उलटले, स्वत:च्याच जाळ्यात अडकली

अपघात झाल्याचे कळताच काही नागरिक व खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र हा अपघात इतका भीषण होता की भूषण आयगल याचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास खोपोली पोलीस करत आहेत

दरम्यान, भूषण हा खोपोली येथील शास्त्रीनगर परिसरातील रहिवासी होता. त्याच्या अकाली मृत्यूने संपूर्ण खोपोली शहर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here