नवी दिल्ली : चीनमध्ये सर्वकाही अलबेल नाही. चीनमधील उद्योगपती गायब होण्याच्या घटना समोर येत आहेत. आधी अलीबाबा या कंपनीचे संस्थापक जॅक मा अचानक गायब झाले होते. यानंतर आता चीनमधील एक बडे इन्व्हेस्टमेंट बँकर बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. चीनमधील सर्वात मोठ्या इन्व्हेस्टमेंट बँकर्स पैकी एक असलेले बाओ फान हे गायब झाले आहेत. बाओ फान यांची कंपनी रेनसॉने हाँगकाँग स्टॉक एक्सचेंजला याची माहिती दिली आहे. कित्येक प्रयत्नांनंतरही बाओ यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. ५२ वर्षीय बाओ फान हे गेल्या तीन-चार दिवसांपासून गायब आहेत, असं कंपनीने म्हटलं आहे. ही वृत्त येताच कंपनीचे शेअर ५० टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.

चीनमधून गायब होत आहेत उद्योजक

चीनमधील सर्वात मोठ्या इन्व्हेस्टमेंट बँकर्सपैकी एक बाओ फान हे बेपत्ता आहेत. यापूर्वी अलिबाबा या आंतरराष्ट्रीय कंपनीनेचे संस्थापक जॅक मा हे गायब झाले होते. बऱ्याच काळानंतर ते टोकियोत आढळून आले. त्यापूर्वी २०१५ मध्ये चीनचे वॉरन बफे म्हणून ओळख असलेले गुओ गुआंगचांगही अशाच प्रकारे गायब झाले होते. यानंतर २०२० मध्ये चीनमधील रिअल इस्टेटचे किंग अशी ओळख असलेले रेन झिकियांग अचानक बेपत्ता झाले. २०२१ मध्ये जॅक मा गायब झाले आणि आता बाओ गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. चीन उद्योजक आणि व्यावसायिक गायब का होत आहेत? असा प्रश्न पुन्हा उपस्थित करण्यात येत आहे.

घटनाक्रम बघता रेन झिकियांग यांनी कथितरित्या चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग यांची टीका केली होती. त्याच्या काही दिवसांतच ते बेपत्ता झाले होते. नंतर त्यांना १८ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तर चीन सरकार कंपनीच्या व्यवहारात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप जॅक मा यांनी जाहीपणे केला होता. त्यानंतर तेही गायब झाले होते. अनेक महिन्यांनी ते टोकियोमध्ये आढळून आले. चीनच्या भ्रष्टाचार धोरणामुळे सर्वच उद्योजक घाबरले आहेत. बाओ यांच्या कंपनीचे अध्यक्ष कोंग लीन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यांचीही चौकशी करण्यात येत आहे, असं ब्लुमबर्गच्या एका वृत्तात म्हटलं आहे. चीनमध्ये कुठल्याही व्यावसायिकाची सरकारकडून चौकशी सुरू होता. तो व्यावसायिक अचानक गायब होतो, असं अनेकदा समोर आलं आहे.

कोण आहे बाओ फान?

बाओ हे चीनचे मोठे इन्व्हेस्टर बँकर आहे. त्यांनी २००५ मध्ये चायना रेनसॉची सुरुवात केली होती. या कंपनीच्या मदतीने ते अनेक टेक कंपन्यांमध्ये डील घडवून आणतात. कंपन्यांमधील विलिनीकरणात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांनी Didi कॅब बुकींग आणि Kuaidiचे विलिनीकरण, फूड डिलिवरी अॅप Meitus आणि Dianpingच्या विलिनीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय त्यांनी जेडी डॉट कॉम या ई कॉमर्सचा आयपीए आणण्याची मोठी जबाबदारी बजावली होती. त्यांच्या कंपनीने Ctrip आणि Qunarमध्ये समेट घडवून आणला होता. बाओ हे टेक कंपन्यांमधील मोठे गुंतवणूकदार आहेत. चीनमधील टॉपच्या लिडींग ब्रोकर पैकी ते एक होते.

पडते शेअर्स, घसरती संपत्ती… तरीही अदानींच्या शेअरवर ब्रोकरेजला भरवसा, दिला खरेदीचा सल्ला
चीन सरकारचे धोरण हे उद्योजक आणि व्यावसायिकांच्या अचानक गायब होण्याचे मोठे कारण आहे. उद्योजकांना चीन सरकार ज्या प्रकारे वागणूक देते, ते एक मोठं कारण आहे. खासगी उद्योगांकडे किंवा उद्योजकांच्या हाती अधिक मालमत्ता असून नये, अशी चीन सरकारची भूमिका आहे. शी जीनपिंक याला मोठा धोका समजतात. यामुळे गेल्या काही वर्षांपासून चीनमधील उद्योजकांची मालमत्ता जप्त करणं आणि त्यांच्या अटकेची प्रकरणं वाढली आहेत. २०१२ मध्ये सत्ता आल्यानंतर चीनमधील जीनपिंग सरकारने भ्रष्टाचारविरोधी मोहीम राबवण्यास सुरुवात केली होती. भ्रष्टाचारविरोधी कायद्यामुळे चीनच्या उद्योग जगतात भीतीदायक चित्र आहे. आतापर्यंत कायद्यामुळे लाखो नागरिकांची चौकशी झाली आहे. फक्त व्यावसायिक, उद्योजकच नाही तर सैन्यातील जवान आणि अधिकाऱ्यांनाही या कायद्यानुसार शिक्षा सुनावण्यात आली आहे. अनेक उद्योजक या कायद्यामुळे लपून बसतात. तर काहींना सरकार गायब करते, असं बोललं जातंय.

IT विभाग तुमच्यावर पाळत ठेवून; उत्पन्न आणि खर्चावर आहे नजर, माहिती लपवली तर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here