अदानी समूहाच्या एका शेअरमध्ये चांगली वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून हा स्टॉक त्यांची सिमेंट कंपनी, अंबुजा सिमेंटचा आहेत. ब्रोकरेज हाऊस फिलिप कॅपिटलच्या विश्लेषकांनी म्हटले की अंबुजा सिमेंटचे तिमाही निकाल चांगले आहेत आणि आमच्या अंदाजापेक्षा जास्त आहेत. ब्रोकरेज हाऊसने नुकत्याच झालेल्या किमतीत सुधारणा केल्यानंतर अंबुजा सिमेंटच्या शेअर्सचे रेटिंग अपग्रेड केले आहे. अंबुजा सिमेंटचा शेअर मंगळवारी बीएसईवर ३५२.९० रुपयांवर क्लोज झाला.
अंबुजा सिमेंट शेअर्सची लक्ष्य किंमत
ब्रोकरेज हाऊस फिलिप कॅपिटलने अंबुजा सिमेंटच्या शेअर्सवर ‘बाय’ (खरेदी) रेटिंग दिले आणि सिमेंट कंपनीच्या शेअर्सवर ४१० रुपयाची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. यापूर्वी फिलिप कॅपिटलने अंबुजा सिमेंटच्या शेअर्सवर तटस्थ रेटिंग दिली होती. अंबुजा सिमेंटच्या शेअरबद्दल बोलायचे तर त्यांची ५२ आठवड्यांची उच्च पातळी ५९८.१५ रुपये तर ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २७४ रुपये आहे. अंबुजा सिमेंटचे मार्केट कॅप ७० हजार ०७३ कोटी रुपये आहे.
अंबुजा सिमेंटचे शेअर्स कोसळले
अंबुजा सिमेंटचे शेअर्स यावर्षी आतापर्यंत जवळपास ३३ टक्क्यांनी घसरले आहेत. वर्षाच्या सुरुवातीला २ जानेवारी २०२३ रोजी मुंबई शेअर बाजारात (बीएसई) अंबुजा सिमेंटचे शेअर्स ५२६.४५ रुपये या पातळीवर होते. तर हिंडेनबर्गच्या अहवालानंतर २१ फेब्रुवारी २०२३ रोजी कंपनीचे शेअर्स ३५२.९० रुपयांवर क्लोज झाले. अशाप्रकारे अंबुजा सिमेंटचे शेअर्स मागील एका महिन्यात जवळपास ३०% गडगडले आहेत. हिंडेनबर्ग अहवालापूर्वी २३ जानेवारी २०२३ रोजी अंबुजा सिमेंटचे शेअर्स बीएसईवर ५००.९० रुपयांवर ट्रेड करत होते.
(नोट: वर दिलेली माहिती स्टॉकच्या कामगिरीबद्दल आहे, याला गुंतवणूकीचा सल्ला मनू नये. शेअर मार्केटमधील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराशी चर्चा करावी.)