सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील राजेंद्र तुकाराम चव्हाण(वय ५८ वर्ष,रा,झाडी बोरगाव,बार्शी ,सोलापूर) या शेतकऱ्याने सोलापूर मार्केट यार्डात १७ फेब्रुवारी २०२३ रोजी जवळपास पाचशे किलो कांदा विकला होता.कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्याला प्रतिकिलो १ रुपया प्रमाणे भाव मिळाला. मोटारभाडे, हमाली, तोलाई याचे पैसे वजा करून फक्त दोन रुपये शिल्लक राहिले होते. मार्केट यार्डातील सुर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्याने दोन रुपयांचा चेक दिला होता. चेकवर तारीख देखील ८ मार्च २०२३ दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यास दिलेली पट्टी आणि चेक सोशल मीडियावर व्हायरल झाले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

राजू शेट्टींची प्रतिक्रिया

राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतक-यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा? एका बाजूला थकबाकी पोटी शेतक-यांची वीज कनेक्शन धडाधड तोडता आणि डोळ्या समोर पीक करपून जातं. राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये १० पोती कांदे विकल्यावर त्याला किती पैसे आले, ते बघा निर्लज्ज व्यापाऱ्याला दोन रूपयांचा चेक देताना लाज कशी वाटली नाही.

राजू शेट्टी

५१२ किलो कांदा विकून मिळाले फक्त दोन रुपये


शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले,एकूण १० पोती कांदा विक्रीसाठी १७ फेब्रुवारी रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणले होते.यामध्ये ८ पोत्यांचे वजन ४०२ किलो भरले तर २ पोत्यांचे वजन ११० किलो भरले होते.कांद्याचे दर घसरल्याने प्रतिक्विंटल १०० रुपयांप्रमाणं प्रमाणे भाव मिळाला. शेतकऱ्याचं एकूण बील ५१२ रुपये झाले. हमाली,तोलाई,मोटारभाडे असे एकूण ५०९ रुपये खर्च झाले होते.५१२ रुपयांमधून ५०९ रुपये वजा केले असता,शिल्लक २ रुपये राहिले. नासिर खलिफा(सूर्या ट्रेडर्स) या व्यापाऱ्याच्या दुकानातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमानुसार २ रुपयांची पट्टी देण्यात आली. सोशल अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे दोन रूपयांचा चेक राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्याच्या नावे देण्यात आले.चेकवर ८ मार्च २०२३रोजीची तारीख देण्यात आली आहे.दोन रुपयांसाठी शेतकऱ्यास पुन्हा सोलापुरातील मार्केट यार्डात यावे लागणार आहे.

जगातील टेक्नोक्रॅटस करु शकले नाहीत ते नंदुरबारच्या पठ्ठ्याने करुन दाखवलं, अ‍ॅपल कंपनीकडून मिळाले ११ लाख

व्यापाऱ्याची भूमिका

सुर्या ट्रेडर्सचे मालक नासीर खलिफा यांनी माहिती देताना म्हणाले, १७ फेब्रुवारी रोजी मार्केट यार्डात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती.सुर्या ट्रेडर्स या दुकानात एकूण ११ हजार २३५ पोती कांद्याचे आले होते.त्यामध्ये ८६० कांद्याची पोत्यांचा लिलाव १०० ते २५० रुपये प्रतिक्विंटल दराने लिलाव झाला.त्याच दिवशी २३६० कांद्याची पोत्यांचा १००० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल दराने लिलाव झाला.

कोण आहे Bao Fan? चीनमध्ये पुन्हा उडाली खळबळ, जॅक मा नंतर आणखी एक अब्जाधीश गायब

कांद्याची आवक वाढल्याने दर घसरले

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याची आवक वाढली आहे.यामध्ये उत्तम दर्जाच्या कांद्याला आजदेखील १ हजार रुपये ते १४०० रुपये भाव मिळत आहे.बारीक,चिंगळी,फकडी या प्रकारच्या मालाला कमी दर प्राप्त होतो.राजेंद्र चव्हाण (झाडी बोरगाव,ता बार्शी) येथून आलेल्या शेतकऱ्याबे बारीक व चिंगळी प्रकारचा माल आणला होता,कांद्याच्या दर्जानुसार त्याला भाव मिळाला आहे.नियमानुसार प्रत्येक शेतकऱ्यास चेकने मोबदला दिला जातो.१७ फेब्रुवारी रोजी देखील २ रुपयांचा चेक देण्यात आला.कांद्याची आवक कमी झाली आणि मागणी वाढली तर खराब मालाला देखील भाव मिळतो, असे नासिर खलिफा यांनी माहिती देताना सांगितले.

ठाकरेंच्या वकिलांचा कडक युक्तिवाद, याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, महत्त्वाचे निर्देशही दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here