सांचेस आणि अमन एकमेकांना चार-पाच वर्षांपासून ओळखतात. आधी दोघांमध्ये मैत्री झाली. भेटीगाठी सुरू झाल्या. सांचेस खजुराहोला येऊन एका ठिकाणी होमस्टेवरही राहिली. दोघांच्या मैत्रीचं रुपांतर कालांतरानं प्रेमात झालं. आता त्यांना लग्न करायचं आहे. त्यासाठी त्यांनी छतरपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. सांचेस खजुराहोला फिरायला आला होत्या. त्यावेळी सांचेस आणि अमन यांची ओळख झाली. दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाच्या निर्णयाला हिरवा कंदिल दिला आहे.
चार वर्षांपासून सांचेसची ओळख झाल्याचं शेख अमन यांनी सांगितलं. ‘त्यावेळी मी हस्तकलेच्या वस्तूंच्या दुकानात कामाला होतो. तिकडे सांचेस खरेदीसाठी आली होती. तीच आमची पहिली भेट ठरली. नंतर भेटीगाठींचा सिलसिला वाढू लागला. मैत्री झाली, पुढे तिचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी एकमेकांना प्रपोज केलं. त्यानंतर आम्ही रिलेशनशीपमध्ये होतो. आता आम्हाला लग्न करून कायम सोबत राहायचं आहे,’ असं अमननं सांगितलं.
एका परदेशी महिलेला खजुराहोतील तरुणाशी लग्न करायचं आहे. त्यासाठी आमच्याकडे अर्ज आल्याचं सहायक जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितलं. आम्ही अर्ज स्वीकारला आहे. त्यावर कायदेशीर प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.