सातारा : पोलीस असल्याचे सांगून वडूज येथील एका व्यापाऱ्याला अज्ञातांनी साडेसहा लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. संशयित अज्ञात व्यक्ती काल दुपारी पाठीमागून आली आणि पोलीस असल्याचे सांगून साडेदहा तोळे सोने घेऊन पसार झाला. या घटनेने वडूज शहरात खळबळ उडाली आहे.

कांदा, बटाट्याचे व्यापारी प्रकाश बनकर (वय ७१) हे मंगळवारी दीड वाजण्याच्या सुमारास माल खरेदी करून मोटारसायकलवरून घरी निघाले होते. काही अंतरावर गेल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने त्यांना मागून हाक मारण्यास सुरुवात केली. पण त्यांचे लक्ष नव्हते. पुढे ५० मीटर अंतरावर गेल्यावर जोरजोरात हाका मारण्यास अज्ञात व्यक्तीने सुरुवात केली. तो तोडकीमोडकी हिंदी भाषा बोलत होता. बनकर थांबल्यानंतर “तुम्हाला किती हाका मारायच्या. बहिरे आहात का? तुम्हाला ऐकू येत नाही का? मी स्पेशलचा माणूस आहे. मला तुमचा तपास करायचा आहे? काय आहे तुमच्याकडे? असे म्हणत असतानाच एक तरुण मोटारसायकलवरून त्याच मार्गावरून जात होता. अज्ञात व्यक्तीने त्यालाही अडवून तपासणी सुरू आहे. तू कुठे चालला आहेस? असा दम देऊन त्याच्याकडून त्याच्याजवळील अंगठी, लॉकेट, पाकिटातील पैसे काढून घेऊन ते त्या तरुणाच्या रुमालात बांधून तो पुन्हा त्या तरुणाला दिला. तरुण रुमालातील ऐवज घेऊन पुन्हा आल्या मार्गी परत गेला.

बनकर हा घडलेला प्रकार पाहत होते. त्याचवेळी त्या अज्ञात व्यक्तीने बनकर यांना आपल्याजवळील मौल्यवान साहित्य देण्यास सांगितले. घडल्या प्रकारावरून बनकर यांनीही आपल्या जवळील दोन सोन्याच्या अंगठ्या, गळ्यातील सोन्याचा गोफ, घड्याळ, मोबाइल, रोख तेराशे रुपये असा ऐवज रुमालात ठेवून तीन-चार पक्क्या गाठी बांधल्या. यावेळी त्याने हातचलाकी केली. बनकर यांनी थांबल्या जागीच रुमालाला बांधलेल्या गाठी सोडून पाहिले. आपला सोन्याचा ऐवज लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
गर्दीची ठिकाणं पाहायचे, टेहळणी करत सावज निश्चिती, डाव टाकून गायब व्हायचे, अखेर पोलिसांनी खेळ संपवला
बनकर यांनी तातडीने मोटारसायकल वळवून अज्ञात व्यक्तीचा पाठलाग केला. मात्र, तो आढळून आला नाही. या धक्क्याने मात्र ज्येष्ठ नागरिक बनकर यांचा बीपी लो झाला. त्यांनी प्रसंगावधान राखत बाजारपेठेत मित्रांना सांगितले. पण ज्यावेळी हा अज्ञात व्यक्ती बनकर यांच्याशी बोलत असताना तो व्यक्ती जसे म्हणला तसे बनकर करत होते. त्याने माझ्यावर संमोहन केल्यासारखेच वाटत होते. मला त्यावेळेस काही सुचत नव्हते. पण हा प्रकार तो गेल्यानंतर माझ्या लक्षात येऊ लागला, असे कांदा, बटाट्याचे व्यापारी प्रकाश बनकर हे सांगत होते.
संसारगाठ पाचव्याच दिवशी सुटली, हळद उतरण्याआधीच नवविवाहितेचा मृत्यू, लग्नघरावर शोककळा
या घटनेची वडूज पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. हा अज्ञात व्यक्ती शहरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याची निदर्शनास आले आहे. दरम्यान, चोरीच्या अशा विविध घटनांमुळे वडूजमध्ये नागरिकांत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्हेगारांवर जरब बसवावी, मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here