पुणे : दिवसेंदिवस अतिशय रंगत अवस्थेत येत आहे. प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आज चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी पवारांनी आपली पॉवर दाखवत वंचित बहुजन आघाडीला मोठं भगदाड पाडलं आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचं टेन्शन वाढलं असून पवारांच्या खेळीने नाना काटे मात्र सुखावले आहेत. वंचित बहुजन आघाडीला चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर जबरदस्त हादरा बसला असून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ‘वंचित’ ही भाजपाची ‘बी’ टीम बनली असून देशातील लोकशाही वाचवायची असेल तर भाजपला हद्दपार करावी लागेल. त्यामुळे आपण वंचितमधून बाहेर पडत असल्याचे तायडे यांनी यावेळी जाहीर केले. तायडे यांनी केलेल्या पक्षांतरामुळे नाना काटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.“वंचित ही भाजपची बी टीम…!”यावेळी बोलताना तायडे म्हणाले, “भाजपच्या सत्ताकाळात देशातील वंचितांच्या शोषणाची परिसीमा गाठली आहे. त्यामुळे वंचित घटकाच्या संरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाला मदत करणारी कोणतीही कृती टाळली पाहिजे, ही कार्यकर्त्यांची भावना होती. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे”.”देशात भाजपकडून हुकूमशाही आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भाजपचा पराभव करणे ही काळाजी गरज बनली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पूरक ठरणारी भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती”.नाना काटेंच्या मदतीला खुद्द मोठ्ठे साहेब धावले! राष्ट्रवादी काँग्रेस कडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांपैकी नाना काटे आणि राहुल कलाटे यांच्यामध्ये तिकिटासाठी जोरदार फाईट झाली. मात्र नाना काटे यांचं तिकीट फायनल झाल्यानंतर राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज तसाच ठेवला. त्यामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढलं होतं. त्यातही वंचित बहुजन आघाडीने राहुल कलाटे यांना पाठिंबा दिल्यानंतर नाना काटे यांच्यासाठी आणखीनच परिस्थिती अवघड होऊन बसली होती. मात्र आता काटेंच्या मदतीला थेट शरद पवारच धावून आल्यानंतर चिंचवडचं सगळं गणितच बदलले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here