वाशिम : जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील जगप्रसिद्ध अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर १९८१ पासून दिगंबर व श्वेतांबर समुदायामधील मंदिराच्या मालकीच्या वादावरून कुलूप बंद आहे. या मंदिराचे कुलूप उघडून मंदिरातील पार्श्वनाथाच्या मूर्तीला लेप करण्याचे आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे जैन धर्मियांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे.

शिरपूर जैन येथे शेकडो वर्षांपूर्वीचे जगप्रसिद्ध अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर आहे. या मंदिरासाठी सुमारे शंभर वर्षांपासून दिगंबर जैन व श्वेतांबर जैन पंथामध्ये वाद आहे. या वादामुळे २२ एप्रिल १९८१ ला या मंदिराला कुलूप लागले होते. तेव्हापासून सामान्य भक्तांना छोट्या झरोक्यातून अंतरिक्ष पार्श्वनाथाचे दर्शन घ्यावे लागत आहे. पूर्वी कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर एक गट त्या विरोधात वरिष्ठ कोर्टात अपील करीत होता. अखेर प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले. तिथेही कित्येक वर्षांपासून निकाल होत नव्हता. आता मात्र २२ फेब्रुवारीला मंदिराचे दरवाजे उघडून सूचनेनुसार अंतरिक्ष पार्शनाथाच्या मूर्तीला लेप करावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. या निकालाची माहिती शिरपूर जैन येथे पोहोचतात जैन समुदायाच्या वतीने मोठा आनंद व्यक्त करुन पेढे वाटण्यात आले. दिगंबर संस्थानच्या वतीनेही अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराचा दरवाजा उघडत असल्याने भाविकांनी दर्शनाला यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हे मंदिर भाविकांसाठी खुले व्हावे, अशी दोन्हीही पंथांची व संतांची इच्छा होती. मात्र, सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नव्हता.

मंदिर उघडून लेप होणार असल्याने जैन धर्मीयांसह गावकऱ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी करताना अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराचे दरवाजे उघडवून मूर्तीला लेप करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती वकिलाद्वारे देण्यात आली. भगवंताचे मंदिर दर्शनासाठी खुले असावे, ही आमची मागणी होती. मंदिराचे दरवाजे उघडणार असल्याने जैन भक्तांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे, असे परमहंसजी महाराज
जैन संत शिरपूर यांनी सांगितले.
ऊस तोडणीसाठी घेतलेले पैसे दिले नाहीत; मुकादमाने मजुराच्या पत्नीसह ११ महिन्यांचा मुलीला उचललं
का आहे मंदिर बंद?

४२ वर्षांपूर्वी म्हणजेच २२ एप्रिल १९८१ ला दिगंबर जैन व श्वेतांबर जैन या दोन्ही पंथामधील वादामुळे मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. पोलिसांच्या उपस्थितीत सकाळ- संध्याकाळ मंदिराचे कुलूप उघडून केवळ दोन्ही पुजाऱ्यांच्या हस्ते दूरवरुनच अंतरिक्ष पार्श्वनाथाची पुजा व आरती केली जात होती. आरतीनंतर पुन्हा मंदिराला कुलूप लावून सील करण्यात येत होते. देशभरातून येणाऱ्या भाविकांना मंदिराला लगत असलेल्या एका झरोक्यातून दर्शन घ्यावे लागत होते. ५ फेब्रुवारी २०२२ ला तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दर्शन घेतले होते.

पोलीस होण्याची लढाई मैदानावरच संपली; १६०० मीटर धावल्यानंतर कोसळला, तरुणाचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here