आज सायंकाळच्या सुमारास महाविका स आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा प्रचार सुरू होता. सचिन भोसले हे प्रचारात सहभगी झाले होते. मात्र प्रचार दरम्यान अज्ञात व्यक्तीनी येऊन माराहणा करण्यास सुरुवात केली. त्यात काही जणांनी त्यांच्यावर ब्लेडने देखील वार केल्याची माहिती समोर आली आहे. चिंचवड परिसरातील गणेश नगर भागात ही घटना घडली आहे.
चिंचवडच्या निवडणुकीचा प्रचार काही दिवसात संपणार असल्याने दिग्गजांची प्रतिस्थांपणाला लागली आहे. त्यामुळे आज भोसले यांना झालेल्या मारहाणीने निवडणुकीला गालोबोट लागल्याचे पहायला मिळत आहे.
याबाबत सचिन भोसले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी संगितले की, सायंकाळच्या.सुमारास.नाना काटे यांचा प्रचार सुरू असताना माझ्यावर काही व्यक्तीनी रस्ता अडवल्याचे कारण देत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील काही जणांनी माझ्यावर ब्लेडने देखील वार केले. भाजप कार्यकर्त्यांकडून ही मारहाण करण्यात आल्याचा आरोपसचिन भोसले यांनी केला आहे.
या घटनेने चिंचवड पोट निंवडणुकीला गालबोट लागल्याचे स्मोरणाले आहे. चिंचवडचे पोट निवडणूक ही आता मुद्द्यावरून गुद्द्यवर आल्याचे पहायला मिळत आहे. सचिन भोसले यांच्यावर सद्या ज्युपितर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सचिन भोसले हे उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत.