केपटाऊन: दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकपच्या साखळी फेरीतील लढती पूर्ण झाल्या. स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताची लढत तगड्या अशा ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. गेल्या पाच वर्षात भारतीय संघाचा जगातील अव्वल संघात समावेश होतो. मात्र त्यांना आतापर्यंत आयसीसीच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नाही. आता टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसीच्या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे आणि विजेतेपद फक्त दोन पावलावर आहे.

गेल्या काही काळात भारताला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. विशेषत: नॉकआउट सामन्यात भारताचा पराभव झालाय. गेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत अंतिम फेरीत पोहोचला होता, तेथे ऑस्ट्रेलियाने पराभव केला. अर्थात गेल्या वर्षी बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले होते.

भारतीय महिला संघाने गेल्या काही वर्षात वेगाने प्रगती केली आहे आणि आता वेळ आली आहे करो या मरो सारख्या लढतीत विजय पक्का करण्याची होय. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने साखळी फेरीतील ४ पैकी ३ लढती जिंकल्या आहेत.

IPLआधीच झाला धमाका, भारतीय खेळाडूची वादळी फलंदाजी; ५५ चेंडू, १७ षटकार, कुटल्या इतक्या धावा
सेमीफायनलमध्ये ज्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध भारताची लढत होणार आहे त्यांनी टी-२० मध्ये सलग २२ मॅच जिंकल्या आहेत. मोठ्या आणि नॉकआउट मॅचमध्ये त्यांची कामगिरी कमालीची उंचावते. ऑस्ट्रेलियाने मार्च २०२१ साली न्यूझीलंडविरुद्ध एक टी-२० मॅच गमावली होती. त्यानंतर या संघाने कोणत्याही फॉर्मेटमध्ये मिळून फक्त २ मॅच गमावल्या आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही पराभव भारताविरुद्ध झाले आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनलमध्ये विजय मिळवण्याचा विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला गोलंदाजीत दमदार कामगिरी करावी लागले. तर फलंदाजीत निर्धाव चेंडूचे प्रमाण कमी करावे लागले. भारताला सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर या दोन गोष्टींवर अधिक फोकस करावा लागले. त्याच बरोबर भारतीय संघाला गेल्या वेळी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची ही मोठी संधी आहे.

क्रिकेटमधील ८७ वर्षापूर्वीचा विक्रम मोडला; ४० वर्षाच्या खेळाडूने ऑस्ट्रेलियाला दिला जबरी झटका
कधी आणि कुठे होणार सेमीफायनल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत उद्या म्हणजेच २२ फेब्रुवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता सुरू होईल. ही लढत केपटाऊन येथे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here